नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरातून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या निर्णयावर फैसला (removed Article 370 from Jammu and Kashmir valid or invalid? ) होणार आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने जम्मू-काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच राज्याला जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागात विभागणी केली होती आणि दोघांना केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला होता.
या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्व याचिका ऐकल्यानंतर सप्टेंबरमध्ये कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला होता आणि आज निर्णयावर (Supreme Court decision today) दिवस उजाडला आहे. म्हणजेच 370 कलम रद्द केल्याच्या 4 वर्ष, 4 महिने आणि 6 दिवसांनंतर केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता की अयोग्य यावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेतला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ यावर फैसला देणार आहे. पाचा वरिष्ठ न्यायाधीश न्या, डिवाई चंद्रचूड. न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बीआर गवई आणि न्या. सुर्यकांत या न्यायाधीशांचा या घटनापीठात समावेश आहे.