पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
विधानसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही तरी रिपब्लिक. कार्यकर्त्यांनी राज्यभर प्रामाणिकपणे भाजप महायुती ला साथ दिली. मात्र तरीही रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळाला नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा भेटून आश्वासन दीले तरीही मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान दीले नाही.त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर आमचा विश्वास होता.अजून विश्वास आहे.त्यांनी उरलेल्या दोन मंत्री पदांमध्ये एक मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला द्यावे.त्यांनी अनेकदा रिपब्लीकन पक्षाला राज्यात मंत्री पद देण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी शब्द पाळला नाही.रिपब्लिक. पक्षाचा विचार केला नाही.आम्ही गृहमंत्री अमीत शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नद्दा यांना भेटून महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद देण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्वासन.दिले होते मात्र पाळले नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षात नाराजी असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
लोकसभेत जे मतदान मिळाले नाही ते मतदान विधानसभेत भाजपा महायुतीला मिळाले. सर्व समज घटकांचे मतदान मिळाले त्यासोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेचे मतदान मोठ्या प्रमाणात महायुतीला मिळाले. त्यामुळे महायुतीचा महविजय झाला आहे .रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे पण प्रामाणिक पक्ष आहे एका जील्ह्यापूरता मर्यादित पक्ष नाही तर राज्यभर महत्वाचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एक ही जागा दिली नाही तरी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व मतदार संघात भाजप महायुतीला साथ दिली.मात्र मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही अशी नाराजी ना.रामदास आठवले यांनी आज बांद्रा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.