मुंबई ताज्या बातम्या

गरीब रुग्णांना राखीव खाटा नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार? विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा सवाल 

विधान परिषदेत गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा आणि पंचतारांकित रुग्णालयांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करताना आमदार चित्रा वाघ.

मुंबई: मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयांनी शासकीय सवलतींचा लाभ घेत असूनही गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देण्याच्या अटींचे पालन होत नसल्याचा मुद्दा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

चित्रा वाघ यांनी शासनाला दोन प्रमुख प्रश्न उपस्थित केले. महापालिकेकडून सवलतीच्या दरात जमीन, एफएसआय आणि इतर शासकीय लाभ मिळाल्यानंतरही अटींचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने आणि सवलती रद्द करण्यात येणार का, तसेच गरीब रुग्णांना राखीव खाटा नाकारल्याप्रकरणी संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार का, असा सवाल त्यांनी केला.

केवळ नोटिसा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. गरीब रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष तपास मोहीम राबविण्यात येईल, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल तसेच शहर व जिल्हास्तरावर गरीब रुग्णांसाठी उपलब्ध खाटांची माहिती देणारी डॅशबोर्ड प्रणाली विकसित करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Rajkaran Bureau

About Author

3 Comments

  1. rkdipphitm

    July 7, 2026

    qvlyygfoexnzqjshdofumjkpenhuvl

  2. txuqovusox

    July 7, 2026

    rlpurjhrlrgkxqeqrtfinmtoojukjt

  3. Annice Borden

    July 7, 2026

    I have recently started a website, the information you offer on this web site has helped me greatly. Thank you for all of your time & work.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज