मुंबई
भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मातोश्रीवर पक्ष प्रवेश केला. मुंबई उपनगरात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या भाजप रामराज्य म्हणत रावणराज्यच्या दिशेने जात आहे. रामाच्या नावाखाली देशात राजकारण केलं जात आहे. केवळ सत्तेसाठी रामाचा उपयोग केला जात असल्याचा आरोप संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी केला. हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे खरं हिंदूत्व जपणारे उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझं खुलं चॅलेंज आहे, संपवून दाखवा. सर्व शिवसेनेत आलेल्यांचं स्वागत आहे. तुमच्या हृदयातील सत्य गोष्टी समोर आल्या आहेत. सत्तेत असलेल्या पक्षात जाणं सोपं असतं, मात्र कठीण प्रसंगी जे सोबत येतात त्यांचं महत्त्व मोठं असतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सर्वांचं स्वागत केलं.
प्रदिप उपाध्याय भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव, घनश्याम दुबे विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष:भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषद, रविचंद्र उपाध्याय : विश्व हिंदू परिषद : जिल्हा कोषाध्यक्ष (माजी) उत्तर मुंबई , बोरिवली; अक्षय कदम आंतरराष्ट्रीय बजरंग दल, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष; माधवी शुक्ला भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्ष (पूर्व) मिरा – भाईंदर; राम उपाध्याय भाजपा जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर; संजय शुक्ला अखिल भारतीय ब्राम्हण परिषद:राष्ट्रीय महासचिव; प्रदिप तिवारी शिंदे गट जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर; दिपक दुबे विश्व हिंदू परिषद:जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली; दिनेशकुमार यादव विश्व हिंदू परिषद :तालुका प्रमुख( प्रखंड) बोरिवली; सूरज दुबे बजरंग दल तालुका(प्रखंड) प्रमुख.. यांच्यासोबत शेकडो कार्यकत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना नेते विनायक राऊत, विभाग प्रमुख उद्देश पाटेकर आणि संघटक उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशमुळे आगामी निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.