ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही व्यक्ती कोण? शोध घ्या, मग कळेल’; संजय राऊतांचा फोटोबॉम्ब

पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साक्षीदार आहे. हेमंत दाभेकर हा जामिनावर असून शरद मोहोळ याच्या अत्यंत जवळचा मानला जातो. दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विट केला आहे. ‘काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या?’ असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यांनी पुढे लिहिलं, मा. गृहमंत्री देवेंद्र, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात.
गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या?
मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत, असे धक्कादायक आरोप संजय राऊतांनी केले आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतल्याने टीका केली जात होती. त्यानंतर उल्हासनगरमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर वातावरण तापलेलं असताना श्रीकांत शिंदे यांची जामिनावर असलेला गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. विरोधकांकडूनही यावर जोरदार टीका केली जात आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात