ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सत्यशोधक’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री; अजित पवारांचा मोठा निर्णय

मुंबई

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्त्री वर्गाला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्राबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सत्यशोधक महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यभरात साजरी करण्यात आली. याच्या दोन दिवसांनी म्हणजेच ५ जानेवारी रोजी सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झाला. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत पार पडला.

सत्यशोधक चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी जोतिरावांची भूमिका साकारली असून सावित्रीबाईंच्या भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने वठवली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी महत्त्वाचे निर्णय
मंत्रिमंडळ निर्णय –

● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
(महिला व बालविकास)

● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी.
(ग्राम विकास विभाग)

●शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
(वित्त विभाग)

● ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी.
(वित्त विभाग )

● जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी.
(दिव्यांग कल्याण विभाग)

● पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता.
(ग्राम विकास विभाग)

● महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार.
(मदत व पुनर्वसन विभाग )

● राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.
(अन्न व नागरी पुरवठा)

● राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याबाबत.
(विधी व न्याय विभाग)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात