ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शालिनीताई पाटलांनी केली नातवाची कानउघडणी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत घमासान पाहायला मिळत आहे. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सांगत वसंतदाद पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर सांगलीतून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि विशाल पाटील यांच्या आजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल पाटील यांच्या आजी शालिनीताई पाटील यांनी नातवाला खरमरीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारी लढवण्याची तयारी पाच वर्षांपासून करावी लागते. ऑफिसमध्ये बसून काहीही होत नाही. काम करा, मग तिकीट मिळवा, अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही, अशा शब्दात शालिनीताई पाटील यांनी नातवाचे कान धरले.

सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. सध्या या जागेवरुन उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, चंद्रहार पाटील योग्य आहेत. कारण ते दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाले. तालमीतल्या पाचशे लोकांची त्यांच्याकडे संघटना आहे. एकेकाळी मी येथे लोकसभेची निवडणूक लढले आणि जिंकले. त्या काळात साखर उद्योगाबाबत भारत सरकारचं धोरण मी बदलवलं. काम केलं. असे काम करावे, मी कोणाचा तरी नातेवाईक आहे एवढं पुरे नाही. काँग्रेस टिकवायला काँग्रेस लहान मुल नाही. काँग्रेसला 100 वर्षांची परंपरा, ते लहान मुलांचं काम नाही”, असादेखील टोला शालिनीताई पाटील यांनी लगावला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात