महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिंदे – फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजाला झुंझवत आहेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….!

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत असल्याचा गंभीर आरोप करतानाच, राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत, अशा संतप्त शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर थेट हल्लाबोल केला. 

छगन भुजबळ हे आपण राजीनामा दिल्याचे सांगत आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत.त्यातच महाराष्ट्रात महागाई,बेरोजगारी,सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे,महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी,शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी हे दोन्ही नेते मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत असल्याचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला.

राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक सरकारने सत्तेत येताना संविधानाला पायदळी तुडवून लोकशाहीला काळीमा फासला आणि आता सत्तेत आल्यापासून राज्यातला सामाजिक समतोल बिघडवून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे.मंत्री छगन भुजबळ म्हणतात मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्यानंतरच ओबीसी आरक्षण बचावासाठी मेळावे सुरु केले आणि सोबतच ते म्हणतात राजीनाम्याबाबत वाच्यता न करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच मला सांगितले.म्हणजे भुजबळांचे बोलविते धनी सरकारच आहेत, असाही गंभीर आरोप त्यांनी केला.

भुजबळ ओबीसींच्या बाजूने बोलत असल्याचे दाखवत आहेत आणि शिंदे गटाचे आमदार भुजबळांच्या विरोधात बोलत आहेत.ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री कोणीही यांना रोखत नसून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात मराठा ओबीसी समाजात भांडणे लावण्याचे सरकारच करत आहे हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत,आज त्याला पुष्टी मिळत आहे. मात्र या सगळ्या वादामध्ये आणि चिखलफेकीमध्ये महागाई,बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा,वाढती गुन्हेगारी,शेतकरी आत्महत्या याबद्दल सरकार चकार शब्द काढत नाही.किंबहुना या मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकारनेच हा वाद सुरु केला आहे, अशी शंकाही पटोले यांनी उपस्थित केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती पूर्ण केली असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व तमाम शिवप्रेमी जनतेचा घोर अपमान केला असून केवळ सत्ता व खुर्चीसाठी छत्रपतींचा वारंवार अपमान केला जात आहे. शिंदे-भाजपा सरकार मराठा व ओबीसी समाज या दोघांनाही फसवत आहेत पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, आरक्षणाच्या नावावर लोकांची डोकी फोडू नका,महाराष्ट्र पेटवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते जनतेने यशस्वी होऊ दिले नाहीत. आता आरक्षणाचा वाद पेटवून गाव खेड्यातील वातावरणही दुषीत करण्याचे पाप केले जात आहे.राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या या शिंदे-भाजपा व अजित पवार सरकारला जनता कदापी माफ करणार नाही,असेही पटोले यांनी या सरकाराला खडसावून सांगितले.

Also Read: Impact : भुजबळ भाजपच्या वाटेवर? ‘द राजकारण’नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात