मुंबई- मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मात्र आयुक्तांवर शिं सरकारचं प्रेम असल्याचं सांगत, आयुक्तांच्या बदलीला सरकारनं नकार दिल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. आयुक्त इक्बाल चहल यांनी बदली मुख्यमंत्री कार्यालयात होईल की त्यांना दिल्लीत पाठवण्यात येईल, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे.
काय म्हणालेत आदित्य ठाकरे?
आयुक्तांच्या निमित्तानं शिंदे सरकार लक्ष्य
गेल्या २ वर्षात मुंबईची ज्या प्रकारे लूट झाली आहे, ते पाहता भाजप-मिंधे सरकारनं आयुक्त इक्बाल चहल यांना बढती देण्याची शिफारस केली असावी. अशी टीकाही आदित्य ठाकरेंनंी केलीय.
चहल यांच्या बदलीवरुन राजकारण
१९८९ च्या बॅचचे आणि महाराष्ट्र कॅडरचे इक्बाल चहल यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. आचारसंहिता लगू झाल्यानंत ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि जे त्यांच्या स्वताच्या जिल्ह्यात आहेत, त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
इक्बाल चहल हे ठाकरेंच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंशी त्यांचे चांगले संबंध होते. कोरोना काळात आयुक्तांनी चांगलं कार्य केलं होतं. शिंदे सरकारच्या काळात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेतल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्या बदलीवरुन महायुतीतही वाद असल्याची चर्चा होती. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर त्यांची बदली कुठं होणार हा प्रश्न आहे. चहल यांचं लक्ष्य राज्याचं मुख्य सचिवपद असल्याचंही सांगण्यात येतंय.
दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर भिडे यांच्याजागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नेमणूक झाली आहे. मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचाःमुंबईतील कंपन्यांनी खरेदी केलेत 1344 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स, मुंबईचा एकूण वाटा किती टक्क्यांचा?