मुंबई- देशातील राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बाँड्सच्या देणग्यात मुंबईचा वाटा मोठा आहे. मुंबई महानगर परिसरात नोंदणी झालेल्या कंपन्यांनी 1, 344 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण इलेक्टोरल बाँडसच्या तुलनेत ही रक्कम 11 टक्के असल्याचं सांगण्यात येतंय.
2 लाख ते कोट्यवधींच्या देणग्या
इलेक्टोरल बाँडमध्ये देण्यात आलेला निधी हा 2 लाख ते 410 कोटी रुपयांपर्यंत आहे. हे बाँड खरेदी करणाऱ्यांमध्ये बिल्डर्स, औषध कंपन्या, पॅथलॉजी लॅब, हिरे उद्योगाशी संबंधित कंपन्य़ा, गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्या, टेक्निकल कंपन्यांचा समावेश आहे. यातील बऱ्याच कंपन्यांची मुख्यालयं ही मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात आहेत.
अनेक लहान लहान कंपन्यांनी 2019 मध्ये बाँड्सची खरेदी केलेली आहे. विशेष म्हणजे काही कंपन्यांनी एकत्रित एकाच दिवशी हे बाँड खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे.
मुंबईतील टॉप देणगीदार
- क्विल सप्लाय चेन प्रा. लि- 410 कोटी
- वेदांता लिमिटेड- 400 कोटी
- पिरामल ग्रुप- 48 कोटी
- सिप्ला- 39.20 कोटी
- स्वाल कॉर्पोरेशन लि.- 35 कोटी
- आयआरबी- 25 कोटी
- इनऑर्बिट मॉल – 25 कोटी
- एल7 हायटेक प्रा. लि.- 22 कोटी
- के रहेजा- 21 कोटी
- बीकेसी प्रापर्टीज- 20 कोटी
- रे कन्स्ट्रक्शन- 17.5 कोटी
- एसडी कॉर्पोरेसन-17 कोटी
राज्यातूनही अनेक देणगीदार
राज्यातील इतर जिल्ह्यांतूनही अ्नेक कंपन्यांनी अलेक्रोटरल बाँड्स खरेदी केलेले आहेत. यात पुणे, नाशिक, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याच्या इतर भागातून 218 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. राज्यातील एकूण देणगी देणाऱ्या संस्थांची संख्या 76 च्या घरात आहे.
देशात एकूण 12,156 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यात आलेत. त्यापैकी 13 टक्के वाटा म्हणजेच 1562 कोटींचा वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. यात वैयक्तिक बाँड खरेदी केलेल्यांचा आणि ज्या कंपन्यांची माहिती उपलब्ध नाहीत, त्यांचा समावेश नाही.
हेही वाचाःमनसेच्या एन्ट्रीमुळे महायुतीचं जागावाटप आणखी लांबणीवर? उद्यापर्यंत उमेदवार निश्चित होणार