मुंबई
साधारण दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला आणि शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. तेव्हापासून राजकीय डावपेच, हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहे. आज त्याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करतील. आणि दोन्ही गटाच्या आमदारांचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल.
शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यात शिंदे गटाचे १६ तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे याशिवाय अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्याविरोधातही याचिका दाखल करण्यात आलेली नाही.
शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
5) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटील
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील
विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या बाजूने की ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देणार की मधला मार्ग निवडून दोन्ही गटांवर कारवाई करणार नाही, हे पुढील काही तासात समोर येईल.