महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्नेहल जगतापांचा राष्ट्रवादीत प्रवेश – महाडच्या राजकारणात नवे समीकरण?

महाड– महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

“राष्ट्रवादी पुन्हा” या गाण्याच्या धर्तीवर जगताप आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, विशेषतः रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत.

या प्रवेशासंदर्भातील अंतिम चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी होणार आहे. जगताप आणि तटकरे यांच्या एकत्र येण्यामुळे कोकणात नवीन राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात