पुणे
मराठा समाज मागास आहे का, याची चाचपणी करण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली असून आज पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू आहे.
सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत सर्वेक्षण चाचणी बाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बैठकीत निकषांवर चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत या निकषांवर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोग काही भूमिका घेतं का हे पहावं लागणार आहे.