मुंबई : राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) गट-ब संवर्गातील परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला असून विभागाची रद्द करण्यात आलेली ६५० पदांसाठीची आता फेरपरीक्षा (reexamination) घेण्यात येणार आहे . ही परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार असून परीक्षा पारदर्शक व्हावी, या अनुशंगाने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या (Tillis-ion Company) अधिकृत केंद्रावरच ती घेतली जाणार असल्याची माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod ) यांनी दिली आहे .
दरम्यान या विभागातील पदांची भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातच सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षाच रद्द केली.होती . मात्र आता याबाबत राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाने या निर्णयाचे एक परित्रक प्रसिद्ध केले आहे. या परीपत्रकानुसार जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुशंगने 7 शहरातील टीसीएस-आयओएन कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर 14, 15, 16 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इ. बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. पूर्ण सुरक्षित तंत्रांज्ञानासह जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात ही परीक्षा होणार आहे. .
दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांनी दिल्या आहेत. दरम्यान परीक्षार्थी यांनी वेळोवळी याचा अधिकृत केंद्रावर परीक्षा घेण्याची मागणी सोशल मिडीया च्या माध्यमातून केली आहे.