Twitter : @NalavadeAnant
मुंबई
अलीकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या (Dussehra rally) भाषणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशाचे सरन्यायाधिश यशवंत चंद्रचूड यांच्यावर टिका केली होती. त्याची दखल घेत दिल्लीतील पत्रकार डी. उपाध्याय यांनी देशाचे अटर्नी जनरल (Attorney general) यांच्याकडे अवमान याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. यातच शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर निवडणुक आयोगावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिकाही केली होती. तर दसरा मेळाव्याच्या भाषणात त्यांनी देशाचे सरन्यायाधिश चंद्रचुड (Uddhav Thackeray alleges Chief Justice of India Dhananjaya Chandrachud) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून आता डी. उपाध्याय यांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे.
…काहीही फरक पडत नाही – संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाची आणि सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीची बदनामी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, अशा याचिकेमुळे काही फरक पडणार नाही, उलट यामुळे एका सामाजिक प्रश्नाला वाचा फुटेल, असा पलटवार ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला.