परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुचना
मुंबई : प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सूचित केले आहे की, सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी एसटी प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन करेल. या आवाहनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
श्री. सरनाईक यांच्या सूचनेनुसार, एसटी महामंडळाने एक परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळले जाऊ शकतात.
एस.टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाला अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) प्रदान केली आहे. या मशीनद्वारे यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढता येते, ज्यामुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतात. परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावर भर देत सांगितले की, प्रवाशांनी यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास तिकीट काढताना सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील.
गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, आणि यूपीआय पेमेंटद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत, याची काळजी एसटी महामंडळाने घ्यावी, अशी सूचनाही श्री. सरनाईक यांनी दिली आहे.