ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’ चा बुरखा टराटरा फाटला : चित्रा वाघ

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा टराटरा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बुधवारी ट्विटद्वारे केली. सुप्रिया सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय अशी शंका येत असल्याचा आरोपही वाघ यांनी ट्विटमध्ये केला.

वाघ यांनी म्हटले आहे की, श्रीमती सुळे यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिसत आहेत. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळे पिवळे दिसते, त्याप्रमाणे श्रीमती सुळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले तरी त्यात वावगेच दिसते. सुप्रियाताई, हा आजार बरा नव्हे, त्यामुळे लवकर उपचार घ्या, असा खोचक सल्लाही श्रीमती वाघ यांनी दिला.

वड्याचे तेल वांग्यावर ..या म्हणी प्रमाणे सुप्रियाताई आपल्या भावाचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा राग फडणवीस यांच्यावर काढत असून त्याचा काहीच फायदा होणार नाही. या परिस्थितीतही तुमचा चिडचिडेपणा का वाढलाय याचे कारण राज्यातील सूज्ञ जनतेला माहित आहे. सत्ताधारी आमदारांची कदापि तुम्ही चिंता करू नका, त्यांचा ठाम विश्वास सरकारवर आहे. तुम्हीच तुमच्या आमदारांची काळजी करा, कारण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे हे तुम्हाला कळून चुकले असेलच. त्यामुळे ‘अर्श से फर्श’ अशी केविलवाणी स्थिती तुमची झाली असून याहून अधिक अधोगती ती काय असू शकते असा टोलाही श्रीमती वाघ यांनी लगावला.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात