ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा राजकारणाला रामराम !

मुंबई : जळगावच्या राजकारणातील मोठे नेतृत्व असणारे माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain)यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती . मात्र आता त्यांनी राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला आहे असे स्पष्ट केले आहे . त्यामुळे त्यांनी कोणत्याच पक्षात न जाता राजकारणाला रामराम केला आहे .

मी कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही. आपण या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ते काही समाधानकारक नाही. गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात असल्याने प्रत्येक जण आपल्याशी जुळला होता. या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्ष आपले फोटो वापरत असल्याने अनेक पक्षात मी कोणाच्या बाजूने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळं आपण या पुढे कोणत्याही पक्षात जाण्याचा किंवा राहण्याचा प्रश्न नाही. आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून माझा सर्व पक्षांना पाठिंबा असल्याचे स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिले आहे. पुढील काळ आपण आपल्या कुटुंबासोबत घालवणार आहोत, असे सुरेश जेन यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांची राजकारणाची सुरुवात 1980 मध्ये झाली . ते तेव्हा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले. त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1985 मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले. 1990 मध्ये सरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले. 2004 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आमदार झाले. 2009 साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले. 1980 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते सलग 34 वर्षे आमदार होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद दिले होते.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात