मुंबई : साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील ( Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आणि त्यानंतर शरद पवारांनी स्वतः राजेंविरोधात निवडणूक लढवावी अशा मागणीने जोर धरला . मात्र आता ही मागणी स्वतः शरद पवार यांनीच फेटाळून लावली आहे . आज साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत त्यांनी मी सातारा लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल आहे . राज्याची जबाबदारी असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागत आहे. तुमची इच्छा असली तरी ती मला पूर्ण करता येणार नाही, असे सांगून निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळून लावली.
साताऱ्याचा उमेदवार एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर करू. श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. वैद्यकीय कारणांमुळे श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार नाहीत. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांचं नाव चर्चेत आहे. सुनील माने, सत्यजित यांचंही नाव चर्चेतून पुढं आलं आहे. चर्चा करून आम्ही उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेऊ. लोकसभेसाठी मविआचा किमान समान कार्यक्रम असावा. ‘ असं शरद पवार पत्रकार परिषदेत स्पष्ट म्हणाले आहेत., सातारा (Satara) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून, कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांमुळे साताऱ्यातील ताकद आजही अबाधित आहे, हे मला जाणवले. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे एकमत घेऊन काम करावे लागते, त्यामुळे उमेदवारी घोषित करायला थोडा उशीर लागत आहे.असेही त्यांनी सांगितले . त्यामुळे या मतदारसंघातील उमदेवारीचा सस्पेन्स आता आणखीच वाढला आहे .
शरद पवार म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील यांची संसदेत कामगिरी चांगली होती. या वेळी त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभ राहावं, अशी इच्छा होती. पण स्वतः श्रीनिवास पाटील यांनीच प्रकृतीचे कारण देत मी मतदारांना न्याय देत नसेल, तर मी उभा राहायला स्वारस्य नाही, असे त्यांनी सांगितले आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने (युबीटी) काही उमेदवार जाहीर केले आहेत. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे सोडल्यास कुठल्याही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. दरम्यान सातारा लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेऊन शरद पवार निर्णय घेण्याची शक्यता आहे .