उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘मराठी माझी — संवाद भाषा’ कार्यक्रमात मराठी भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेबाबत बोलताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठीची सक्ती नव्हे….; तर ‘भक्ती’च्या बळावर महाराष्ट्राची सांस्कृतिक एकजूट…!

एक लाखाहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले; भाषिक अस्मितेला विकास आणि सामाजिक समावेशकतेशी जोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न Anant Nalawade ठाणे  — महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषा हा केवळ भावनिक मुद्दा राहिलेला नाही; तर तो आता सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक समावेशकता आणि राजकीय स्वीकारार्हतेचा नवा पट बनत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सोमवारी  “मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा” […]

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे आणि विसर्जन मार्गांच्या तयारीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणेशोत्सवाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘खड्डे क्लिअर’ मास्टरप्लॅन

महापालिकांना अल्टिमेटम; विसर्जन मार्गांसह शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश! चांगली कामगिरी करणाऱ्या पालिकांना पुरस्कार; निष्काळजी पालिकांच्या कामगिरीची नोंद निधी देतानाही घेतली जाणार….! मुंबई  — गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील महापालिकांना थेट कामाला लावले. गणेशोत्सव सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मिरवणूक मार्ग, विसर्जन […]

गोदरेज अँड बॉयसकडून एमएमआरडीएला थेट मेट्रो जोडणी प्रकल्पासाठी ₹१० कोटींच्या विकास शुल्काचा धनादेश सुपूर्द करतानाचे छायाचित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि निवासी संकुलांना थेट मेट्रो जोडणीचे एमएमआरडीएचे धोरण; लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीसह बिगर-भाडे महसुलालाही चालना

विक्रोळीतील गोदरेज संकुलाला मेट्रो मार्ग ४ शी थेट जोडणी; ओबेरॉय मॉलनंतर दुसरा प्रकल्प, भारत डायमंड बोर्ससह आणखी प्रस्ताव विचाराधीन मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो स्थानके आणि मोठ्या व्यावसायिक तसेच निवासी संकुलांदरम्यान थेट पादचारी जोडणीचे धोरण राबविण्यास सुरुवात केली […]

Aerial view of the under-construction Kasheli Metro Depot for Mumbai Metro Line 5, showing earthworks, railway connectivity, depot infrastructure and ongoing construction activities. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रो मार्ग ५ च्या परिचालनासाठी महत्त्वाचा टप्पा; कशेळी डेपोचे २३ टक्के काम पूर्ण

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या मेट्रो मार्ग ५ प्रकल्पाच्या दृष्टीने कशेळी मेट्रो डेपोचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले असून, जून २०२६ अखेर या प्रकल्पाची २३ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात उभारला जात असलेला हा डेपो ठाणे–भिवंडी–कल्याण–उल्हासनगर मेट्रो मार्गिकेच्या परिचालन, देखभाल आणि रेल्वेगाड्यांच्या स्थिरीकरणासाठी प्रमुख केंद्र म्हणून विकसित केला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : मुंबई महापालिका निवडणूक: भाजपचा ‘स्वबळाचा नारा’; शिंदेसेना युतीसाठी आतुर, फडणवीसांनी दिला ‘एकला चलो रे’ संदेश

राज्य निवडणुका जाहीर होण्याच्या हालचालीदरम्यान भाजपचा मुंबईत स्वबळाचा निर्धार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी प्रयत्नशील. मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पालघर आणि इतर मोजक्या नगरपालिकांमध्ये ‘स्वबळावर लढण्याचा’ नारा दिला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नगण्य असल्याने, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावा, यासाठी योग्य नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते विकास आणि साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर […]