ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांनी सांगितली अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या आमदारांची नेमकी संख्या

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्रात जून अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडून हा दादा गट एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांची नेमकी संख्या किती याबाबत त्यांनी स्वतः कधी स्पष्ट खुलासा केला नाही आणि फडणवीस यनीही कधी ते जाहीर केले नाही. 40 पेक्षा जास्त आमदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शासकीय विभागात समन्वयाचा अभाव; इलेक्ट्रॉनिक धोरण अपयशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई सेमी कंडक्टरसाठी लागणाऱ्या एफ ए बी (FAB) या कच्च्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने आणलेल्या इलेक्ट्रॉनिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या विविध विभागात समन्वय असणे आवश्यक होते. मात्र, या संदर्भातील सुस्पष्ट निर्देश देण्यात शासन कमी पडल्याने या वेगवेगळ्या विभागात समन्वयाचा अभाव राहिला आणि परिणामी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला अधिकाऱ्याच्या “कारभारा”मुळे फडणवीस समर्थक भाजप मंत्र्यांचे खाते जाणार?

Twitter: @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाचे राज्यातील बाहुबली नेते देवेंद्र फडणवीस हे कधी कोणाला जवळ करतील आणि कधी लाथ मारून बाजूला करतील हे सांगता येत नाही. भ्रष्टाचार आणि  भ्रष्ट नेत्याला पाठीशी न घालणारे फडणवीस यांच्या रागाचा बळी लवकरच त्यांचा एक जवळचा मंत्री ठरणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे त्या मंत्र्याकडील एका महिला अधिकारी. देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज पनवेलमध्ये आयोजित पक्षाच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray) आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Sharad Pawar) फोडून त्यांना सत्तेत […]