ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचं काय उत्तर ?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रचारात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असून ठिकठिकाणी सभा घेतायेत. त्यातच संजय राऊत हेही प्रचारासाठी फिरताना दिसतायेत. यात ठाकरे आणि राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केलीय. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलंय. काय म्हणालेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha: बारामतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामी आली

हर्षवर्धन पाटील काम करण्यास राजी X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात यावेळी भाजपही इरेला पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सुत्र हाती घेतली आहेत. इंदापूर तालुक्यातील अजित पवार यांचे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

“एकच जागा देणं शक्य” : दोन जागा मागणाऱ्या राज यांचा प्रस्ताव शाह यांनी फेटाळला

X: @therajkaran महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांची भेट घेतल्यानंतर दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा हा प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे. मनसेला एकच जागा देता येईलं असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या एन्ट्रीमुळे महायुतीचं जागावाटप आणखी लांबणीवर? उद्यापर्यंत उमेदवार निश्चित होणार

मुंबई- निवडणुका जाहीर झाल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला दिसत नाहीये. भाजपानं राज्यातील २० उमेदवारांची दुसऱ्या यादीत घोषणा केली असली तरी इतर महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्यातच आता मनसे महायुतीत येणार असल्यानं काही जागांचे संदर्भ बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. जागावाटप आणखी रखडणार? महायुतीत शिंदेंची शिवसेना आण अजित पवार राष्ट्रवादीला […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

माढा लोकसभा मतदारसंघावरुन वादंग, भाजपाच्या निंबाळकरांना रामराजे, मोहितेंचा विरोध, तर धैर्यशील मोहिते मविआकडून इच्छुक?

मुंबई- माढा लोकसभा मतादरसंघावरुन राज घराण्यातील संघर्ष उफाळून आलेला दिसतो आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या पहिल्या यादीत रणजीतसिंहं नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या उमेदवारीला अजित पवार राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी आधीच विरोध केला होता. त्यांना यात मोहिते पाटील यांची साथ मिळालीय. शेकापचे जंयत पाटील यांच्या उपरस्थितीत काही दिवसांपूर्वी याबाबत बैठक पार पडली […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

NCP controversy : शरद पवार गटाला कोर्टाचा दिलासा :’राष्ट्रवादी-एससीपी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह निवडणुकीत वापरता येणार

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाला दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी-एससीपी’ हे नाव आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : श्रीनिवास काकांनी जी भूमिका मांडली, ती अख्ख्या महाराष्ट्राची : रोहित पवार

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकेला त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shreeniwas Pawar) यांनी विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेला कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाठिंबा देत अजित पवारांना खडे बोल सुनावले आहेत. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली, तीच भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राज ठाकरे यांची अमित शाहांशी अर्धा तास चर्चा, मनसे महायुतीत येण्याच्या घडामोडींना वेग, निर्णय कधी जाहीर होणार?

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर या भेटीबाबत आणि महायुतीत सहभागी होण्याबाबत निर्णय ते जाहीर करण्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष? राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद किती वाढणार?

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून त्यांची आज भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज ठाकरे यांची भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक पाहायला मिळत होती. यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्यास याचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज ठाकरे महायुतीत आले तर कुणाला फायदा? मनसेच्या वाट्याला काय?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मनसे दाखल होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नवी दिल्लीत पोहचले आहेत. गेल्या काही काळापासून राज ठाकरे महायुतीसोबत येतील, अशी चर्चा रंगली होती. याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा […]