महाराष्ट्र

Baramati Lok Sabha : अजित पवारांना धक्क्यावर धक्के : वहिनी शर्मिला पवार यांनीही साथ सोडली 

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हात मिळवणी केलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण त्यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे. कारण आधी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Madha Lok Sabha : अकलूजमध्ये राजकीय घडामोडींना वेग : मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परतणार?

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 20 मतदारसंघातील उमेदवारांची यादी याआधीच जाहीर केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक- निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते – पाटील (Dhairyasheel Mohite -patil) नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत ते पुन्हा शरद पवार (Sharad pawar) यांच्या राष्ट्रवादीत परत येणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो; पण दोन पक्ष फोडूनच”: देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा 

X: @therajkaran उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवर विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र येताना दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो… असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  सन २०१९ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : अजित पवार नालायक माणूस; ही राजकीय अपप्रवृत्ती संपवणार – विजय शिवतारे 

X : @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. अजित पवार हे नालायक आणि उर्मट माणूस असून अशी घाणेरडी राजकीय अपप्रवृत्ती संपवणारच असा घणाघात शिवतारे यांनी केला आहे. गेल्या चाळीस वर्षांत पवारांच्या विरोधात उभे राहण्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Lok Sabha : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरोधात आदिती तटकरे लढत होणार?

X : @milindmane70 रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करून देखील हाती काही लागले नाही, विरोधात गेलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून सहकारी मिळेलच याची खात्री नसल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी पुन्हा लोकसभेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्या ऐवजी ते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati : नात्याची एक्सपायरी संपली; श्रीनिवास पवार यांनी सख्खा भाऊ अजित पवारांची साथ सोडली

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या अजित पवारांवर (Ajit pawar) त्यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी आपल्यावर अनेक उपकार केले आहेत. आज ते ८३ वर्षांचे असताना त्यांची साथ सोडून जाणे हे मला पटले नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

‘अजित पवारांसारखा नालायक माणूस नाही’, अजित पवारांचे सख्खे बंधू मैदानात, बारामतीत केली सडकून टीका

बारामती- अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आता बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी कुटुंबातील लढत लोकसभेसाठी होणार हे जवळपास निश्चित आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना महायुतीचं तिकिट मिळणार आहे. यात पवार कुटुंबातील अनेक जणांनी शरद पवार यांची साथ दिलेली आहे. रोहित पवार यांच्यापाठोपाठ अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणार लोकसभा निवडणुका, 4 जूनला मतमोजणी, तुमच्या मतदारसंघात कधी मतदान?

नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यात निवडणुका होणार असून, मतमोजणी 4 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात महाराष्ट्रात कधी होणार मतदान 4 विधानसभा राज्यांच्या निवडणुकाही होणार या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सगेसोयरे अध्यादेशाला वेळ लागणार, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी केलं स्पष्ट, अधिसूचनेवर साडे आठ लाख हरकती, जरांगे काय करणार?

मुंबई – राज्यात आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमामपत्र देताना सगेसोयरेंनाही प्रमाणपत्र मिळावीत, यासाठीचा सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. अध्यादेश निघाला नाही तर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]