ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : केंद्राने मदतीची दखल घेतली; महाराष्ट्राला निश्चित मदत मिळेल — विधानसभेत अजित पवारांचे आश्वासन

नागपूर – महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रातील हानी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल २७ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारकडे पाठवला असून केंद्राने त्याची दखल घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की “केंद्राचे पहिले पाहणी पथक येऊन गेले आहे. दुसरे पथक १४ किंवा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक — उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल.–2 आणि सी.एल.–3 परवानाधारक विदेशी व देशी दारूची किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. आ. शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “संबंधित दुकान जर सोसायटीच्या हद्दीत असेल, तर त्या सोसायटीची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेसचा भर…!

हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर भूमिका मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यावर भर देणार असून ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठीची लढाई आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी केले. त्यांनी महायुतीतील (Mahayuti) कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचाही ठाम निर्णय व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये असंतोष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“फुकटात जमिनी लाटण्याचा ‘भस्म्या’ रोग जडलेले अजित पवार; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!” — काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

मुंबई : पुण्यातील महार वतनाची तब्बल ४० एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने कवडीमोल दराने भ्रष्ट मार्गाने हडपल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवावे, असे खुले आव्हान दिले. सपकाळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एस.टी. दरवाढीस मंत्री अनुकूल, पण चांगल्या सुविधा दिल्याशिवाय दरवाढ नाही – अजित पवारांची ठाम भूमिका

मुंबई : एस.टी. महामंडळाच्या तिकीट दरवाढीवरून मंत्रिमंडळात मतभेद उफाळून आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात एस.टी. भाडेवाढीला पाठिंबा दर्शवून लवकरच निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भूमिकेचे खंडन करताना, असा कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला नसल्याचे ठामपणे सांगितले. अजित पवार यांनी भाडेवाढीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशात एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने लक्षणीय यश देत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षविस्ताराची प्रक्रिया जोमाने सुरू राहील आणि कोणतीही कसूर होणार नाही, अशी रोखठोक भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्याखेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्रितसिंह आणि प्रवीणकुमार यांचे खेलरत्न पुरस्काराबद्दल अजित पवार यांच्याकडून अभिनंदन मुंबई: केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन […]

विश्लेषण महाराष्ट्र

…तर शिंदे याची शिवसेना फुटायला वेळ लागणार नाही!

X : @vivekbhavsar महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कौल दिलेला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नऊ जागा जास्त देत भाजपला स्पष्ट बहुमताच्या जवळ आणून ठेवले आहे. भाजपचे स्वतःचे 132 आमदार आणि पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा याशिवाय 41 उमेदवारांना जिंकून आणलेल्या अजित पवारांच्या (Ajit […]

महाराष्ट्र

बदलापूर: “त्या” आंदोलकांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्या : राष्ट्रवादीचे कॅप्टन आशिष दामले यांची अजित पवारांना विनंती

@therajkaran बदलापूर: शहरातील आदर्श विद्यालयातील (Adarsh School) दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची शासन आणि पोलिसांनी दखल घ्यावी यासाठी सर्वसामान्य बदलापूरकर नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. यात काही गृहिणी तसेच विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता हे गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी शहरातील सजग युवक नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्री छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल!

X : @therajkaran मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून सांगण्यात आली. पुण्यात असलेल्या भुजबळ यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईत दाखल करण्यात आले. भुजबळ सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ यांची […]