महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीच्या विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशात एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने लक्षणीय यश देत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्षविस्ताराची प्रक्रिया जोमाने सुरू राहील आणि कोणतीही कसूर होणार नाही, अशी रोखठोक भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मांडली.

त्यासाठी छत्रपती संभाजी नगर अधिवेशनात पक्षाच्या राज्यभरात पक्ष विस्ताराचा आगामी पाच वर्ष विस्ताराचा रोड मॅप जाहीर केला जाणार असून याच अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल, असेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पवार घराणे एकत्र यावे, पण राजकारण वेगळे…..

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी पवार घराणे एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली आहे याकडे लक्ष वेधता तटकरे म्हणाले, “कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या बाबी आहेत.” त्याचवेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षवाढीसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली हे वास्तव असल्याने या संदर्भात दोन दिवसांत भुजबळ यांच्याशी चर्चा करू.मात्र ते पक्षासोबतच राहतील,असेही खा. तटकरे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात आवर्जून नमूद केले.

पालकमंत्री नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा……

पालकमंत्री नियुक्तीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र चर्चा करून लवकरच निर्णय घेतील.तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याने दोन दिवसांत पालकमंत्री नियुक्तीची घोषणा अपेक्षित असल्याचेही खा. तटकरे यांनी स्पष्ट केले.त्याचवेळी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावर भाष्य करताना तटकरे म्हणाले की, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि कोणाचीही गय होऊ नये, हीच पक्षाची ठाम भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्पणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी उपस्थित होती, या शरद पवार गटाचे खा.बजरंग सोनवणे यांच्या आरोपाचे खंडन करताना तटकरे यांनी थेट आव्हानच दिले की,सोनवणे यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा गाडीचा नंबरच द्यावा.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात