ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली ; मोदी -शहांना ओपन चॅलेंज ; “हिम्मत असेल तर या ठाकरेला संपवून दाखवा”

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची परभणीत जाहीर सभा पार पडली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांची ही सभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘काँग्रेस जनतेची संपत्ती घुसखोरांना वाटेल, मंगळसूत्र घेतली जातील’, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड

नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा 29 पटींनी वाढला भाजपा? अवघ्या 5 महिन्यांत 10 कोटींहून अधिक सदस्य, 21 राज्यांत सरकार

नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

फडणवीसांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न, मोदी-शाहांनी फडणवीसांचे पंख छाटलेत, राऊतांचा काय दावा?

मुंबई- उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचे तीव्र पडसाद राजकारणात उमटताना दिसतायेत. भाजपाकडून या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरु असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान होण्याचं मोठं स्वप्न आहे, त्यातूनच त्यांनी हे विधान केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. काय म्हणालेत संजय राऊत? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीचा तिढा सुटला ; नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांची माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून तिढा निर्माण झाला होता . या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकला होता . मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतःहून आपण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?

गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत . काही दिवसांपूर्वी खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोण असली .. कोण नकली .. हे महाराष्ट्राची जनता ठरवेल ; जयंत पाटलांचा अमित शहांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघातून प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथे घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर (mva )टीका केली आहे . राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते . यावर […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

‘विनोद तावडेंकडून फडणवीस चितपट’, खडसेंच्या घरवापसीच्या निमित्तानं काय चर्चा?

मुंबई- एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार आहेत. येत्या १५ दिवसांत नवी दिल्लीत जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. दुसरीकडं प्रदेश पातळीवर याबाबत चर्चा झालीये का, याबाबत त्यांनी मौन बाळगलंय. दुसरीकडे तुटक प्रवेश नको, असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलंय. तर विनोद तावडे यांनी फडणवीस यांना चितपट केल्याची प्रतिक्रिया […]