दिल्लीच्या महायुतीच्या बैठकीत जागावाटप फायनल, काय ठरला फॉर्म्युला, शिंदे-पवारांना शाहांचा काय सल्ला?
नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर अपेक्षेप्रमाणे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या समोर सुटल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार, हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपा ३४, शिंदे शिवसेना १० आणि अजित पवार राष्ट्रवादी ४ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अमित शाहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]