X: @therajkaran
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
नितेश राणे म्हणाले, अमित शाह, मोदी महाराष्ट्र राज्यात येतात, ते राज्याला काही तरी देण्यासाठी. तुझ्यासारखी गद्धारी करण्यासाठी नाही. 370 (Section 370) हटवण्याचा काय फायदा झाला, हे भांडूपमध्ये बसून समजणार नाही. त्यासाठी काश्मीरमध्ये जा. पाकव्याप्त काश्मीर आम्ही घेणारच, पण कधी घेणार हे राऊतासारख्या तीनपाट माणसाला काय सांगायचं अशी टीका राणे यांनी केली आहे.
काठावर पास झालेला राऊत मतदानाची भाषा करतोय. याच दीपक केसरकरांना (Deepak Kesarkar) घेऊन तुझा मालक फिरत होता. तेव्हा तुला केसरकर वाईट दिसले नाहीत. दिशा सालीयन (Disha Salian) प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांना दोन वेळा फोन करतात तर मोदींजवळ गेले असतीलच असा दावा देखील राणे यांनी केला आहे. “दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावा सापडत असल्याने ठाकरे कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली आहे असा हल्लाबोल राणे यांनी चढवला आहे. राऊत तू पहिला शकुनी मामा बनून ठाकरे, पवार, पाटकर कुटुंब फोडलेस. त्याचा हिशोब दे आणि मग मोदींजवळ (PM Modi) हिशोब माग असं नितेश राणे म्हणाले. तसेच विनायक राऊत याने मिठाला तरी जागावं. दीपक केसरकर जे बोलत आहेत, ते खोट असेल तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व सीडीआर रिपोर्ट दाखवावेत. आम्ही किती खोटारडे आहेत हे त्यांनी सिद्ध करावे, ती त्यांची जबाबदारी आहे, असं राणे म्हणाले.