X: @therajkaran
मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी आगामी निवडणुकीला उभारू नये, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता माजी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati on Hasan Mushrif) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. याबाबत टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर सर्व अवलंबून आहे. ते चांगला निर्णय घेतील अशी आशा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शाहू महाराजांसारख्या चांगल्या, प्रामाणिक माणसाने राजकारणात का उतरू नये ? असा सवाल देखील मालोजीराजे यांनी केला. चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत, चांगलं काम झालं पाहिजे तर मग त्याला शाहू महाराज एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. यामध्ये गैर वाटण्याचं काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे का? यावर बोलताना मालोजीराजेंनी ही लोकशाही असून आणि लोकशाहीमध्ये जनताच ठरवेल, असे त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूकीत शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर लढलं गेलं पाहिजे, याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये (MVA) कोल्हापूर (Kolhapur Loksabha) जागेचा तिढा अजून कायम असतानाच आता ही जागा ठाकरे गटाकडून काँग्रेसला (Congress) गेल्याची चर्चा होत आहे. तसेच या जागेवर करवीर संस्थांनचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Also Read: पवार साहेबांनाच सपोर्ट देण्याची गरज: युगेंद्र पवारांची भावनिक साद