X: @therajkaran
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) सध्या बारामती (Baramati) तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे (Sharad Pawar) आहे, असे वक्तव्य केले आहे. मी आज राजकारणात नाही, विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे. मला वाटलं आपण पवार साहेबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे ते म्हणाले. आज त्यांना सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे,अशी भावनिक साद त्यांनी कार्यकर्त्याना घातली आहे.
ते म्हणाले, आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी बारामती हे नाव सांगितल्यानंतर शरद पवार यांचे गाव अशी निर्माण झाली आहे. आपण सगळ्यांनी पवार साहेबांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले आहे. यापूर्वी युगेंद्र कधीही राजकारणात सक्रिय नव्हते. शिवाय, त्यांच्या नावाच्या चर्चा देखील नव्हत्या. मात्र, शरद पवार समवेत एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर युगेंद्र चर्चेत आले.
दरम्यानच्या काळात राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि आता ते सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात सख्ख्या पुतण्यानेचं म्हणजेच युगेंद्र पवार यांनी त्यांच्या विरोधात दड थोपटले होते. त्यानंतर आता थेट शरद पवारांना सपोर्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी भावनिक साद घातली आहे.
Also Read: मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा : कृषीमंत्री धनंजय मुंडे