ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासोबत ‘हे’ आमदार करणार या पक्षात प्रवेश

डॉ.‌ अभयकुमार दांडगेनांदेड मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या एक वर्षांपासून राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यांचा आजचा राजीनामा हा भाजपची वाट धरण्याचे स्पष्ट संकेत आहेत.  मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचे आजी व माजी असे नऊ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामभक्तांच्या सोहळ्यात अशोक चव्हाण यांची गुगली

By Abhaykumar Dandge X: @therajkaran नांदेड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरात मोठे बॅनर लावून राम भक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात राम भक्तांना शुभेच्छा देऊन अशोक चव्हाण यांनी एक राजकीय गुगली टाकली. एकीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला जाण्याचे टाळलेले असताना माजी मुख्यमंत्री व […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अशोक चव्हाणांविरोधात मराठा समाज आक्रमक, गावाच्या वेशीवरच अडवली गाडी

नांदेड महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं असून २० जानेवारी रोजी मराठा बांधव मोठ्या संख्येने आंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाचा रोष सहन करावा लागत आहे. अशात काँगेस नेते अशोक चव्हाण हे एका कार्यक्रमासाठी गावात गेले असता तिथे मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी, करत त्यांना विरोध केला. नांदेड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप धक्कातंत्रानुसार मराठवाड्यात लोकसभेचे उमेदवार निवडणार?

X : @therajakaran भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणातील पुढील पिढी तयार करण्यासाठी भाजपाच्यावतीने महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहेत. त्याची अनुभूती अलीकडे मुख्यमंत्री पदाच्या निवडीत संपूर्ण देशाने पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे मध्य प्रदेश ,राजस्थान, आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने नवीन चेहरा निवडला, त्याचप्रमाणे मराठवाड्यात आगामी लोकसभेसाठी उमेदवार निवडत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? बड्या नेत्याचा दावा

नांदेड एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांनी पक्ष फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर विधानसभेचे चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दर तासाला एक या वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विरोधी पक्षांचा आरोप 

Twitter : @therajkaran नागपूर सध्याचे महायुती सरकार हे पक्ष फोडून स्थापन झालेले सरकार आहे. कायदा- सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून सर्वाधिक दंगली या सरकारच्या काळात झाल्या. एक तासाला एक या पेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या प्रमाणानुसार एक वर्षात २२ हजार सातशे ४६ आत्महत्या (farmers suicide) कर्जबाजारीपणा, दिवाळखोरीमुळे झाल्या. अवकाळी पाऊस, दुष्काळाशी (drought) चार वर्षे शेतकरी झुंजत […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव – अशोक चव्हाण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याचा दावा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात […]