पंकजा मुंडेंना धक्का, कर्जाची रक्कम न भरल्याने वैद्यनाथ कारखाना विक्रीस, 25 जानेवारीला लिलाव
बीड भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. २०३ कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या कारखान्याचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. या महिन्यात २५ तारखेला ई-लिलाव होणार आहे. काही महिन्यांपूर्वी १९ कोटींच्या थकित करापोटी जीएसटी विभागानेही या कारखान्यावर कारवाई […]








