ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर

भिवंडी : सांगली, नगरनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून दावा केला जात होता. मात्र शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेत सुरेफ उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे, आणि ते मविआच्या उमेदवाराला प्रचारात साथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा तडकाफडकी राजीनामा

अंतर्गत कुरघोड्यांचा परिणाम X: @ajaaysaroj मुंबई: भिवंडी पूर्व मधील समाजवादी पार्टीचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात वातावरण तापलेले असताना त्यांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला असून, शेख यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगरी – कुणबी मतदार ठरवणार भिवंडीचा खासदार

पाटील, म्हात्रे, सांबरे यांची सर्व भिस्त जातीवरच X: @ajaaysaroj जाता जात नाही ती जात, असे नेहमीच म्हंटले जाते. पुरोगामीत्वाचे ढोल पिटणारे बहुतांश राजकीय पक्ष जातीचे राजकारण खेळण्यात जास्त पुढे असतात हे महाराष्ट्र गेली दोन दशके प्रामुख्याने बघत आलाय. भिवंडी मतदारसंघात देखील याच जातीच्या समिकरणांमुळे उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय. जवळपास वीस लाखाच्या मतदारसंघात आगरी व कुणबी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडीत “जिजाऊचे “निलेश सांबरे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . वंचितने लोकसभा निवडणूक 2024 ची आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे . या यादीत जिजाऊ” चे निलेश सांबरे (Nilesh Sambare )हे अपक्ष लढणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. निलेश सांबरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार गटाच्या पाच जागांचे उमेदवार आज जाहीर होणार ; माढ्यात अन साताऱ्यात कोणाला उमदेवारी ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला? साताऱ्यातून कोणाची वर्णी?

भिवंडी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आज शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही जागा शरद पवार गटाला दिल्यात येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भिवंडी लोकसभा जागेवरुन महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा – नाना पटोले

X : @nalavadeanant मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नसून त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा असून या जागांवर पक्षाकडे चांगले उमेदवारही आहेत. परंतु, सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा कानपिचक्या देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेसाठी वातावरण तापलं : उद्धव ठाकरेंच्या आधीच संजय राऊतांनी रणशिंग फुंकले

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) रणशिंग फुकलं आहे. कोल्हापूरची जागा आमची असताना आम्ही ती हसत हसत सोडली, पण आता सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

शरद पवार यांनी घेतला ईशान्य मुंबईसह १० लोकसभा मतदारसंघाचा आढावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई ईशान्य, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्यामध्ये १८ […]