ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडीत “जिजाऊचे “निलेश सांबरे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . वंचितने लोकसभा निवडणूक 2024 ची आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे . या यादीत जिजाऊ” चे निलेश सांबरे (Nilesh Sambare )हे अपक्ष लढणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. निलेश सांबरे यांना आता वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांना आता यांना बळ प्राप्त झाल असल्याचा दावा केला जात आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याकडून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (Suresh Gopinath Mhatre )यांना उमेदवारी जाहीर केल्याने त्या ठिकाणी दुरंगी अशी लढत होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर न करता आपली राजकीय बळ जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना दिल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण विधानसभा, शहापूर विधानसभा, मुरबाड विधानसभा, कल्याण पश्चिम विधानसभा, भिवंडी पूर्व विधानसभा, भिवंडी पश्चिम विधानसभा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. भिवंडी लोकसभा मतदारसंघात निलेश सांबरे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सांगली आणि भिवंडी ही जागा गेल्याने काँग्रेसकडून उमेदवारी मिळणे सांबरे यांना कठीण बनले आहे .

लोकसभा 2019 च्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कपिल पाटील यांना 5,23,583 मते तर काँग्रेसच्या सुरेश काशिनाथ टावरे यांना 3,67,254 मते आणि वंचित बहुजन आघाडीच्या अरुण दामोदर सावंत यांना 51,455 मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांना 4,11,070 मते मिळाली होती. काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना 3,01,620 मते मिळाली होती तर मनसेच्या सुरेश म्हात्रे यांना 93,647 मते, बसपाच्या अन्सारी मुमताज अब्दुल सत्तार 14,068 मते मिळाली होती.2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीच्या सुरेश टावरे यांना 1,82,789 मते मिळाली होती तर भाजपच्या जगन्नाथ पाटील यांना 1,41,425 मते मिळाली होती. तर मनसेच्या देवराज म्हात्रे यांना 1,07,090 मते मिळाली. अपक्ष उमेदवार विश्वनाथ पाटील यांना 77,769 मते आणि समाजवादी पक्षाच्या आर. आर. पाटील यांना 32,767 मते मिळाली होती.

Avatar

संतोष कडू - पाटील

About Author

संतोष कडू पाटील (Santosh Kadu Patil) हे पालघर जिल्ह्यातील वाडा येथील वरिष्ठ पत्रकार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात