महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादीतील हे १२ नेते भाजपात जाणार! : अतुल लोंढेंच्या दाव्याने खळबळ

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटातील निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे,धनंजय मुंडेंसह अजित दादा गटातील (Ajit […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Coastal Road: उद्धव ठाकरेंनी भूमिपूजनाही बोलावलं नाही, आदित्य ठाकरेंना कोस्टल रोडच्या श्रेयवादावरुन फडणवीसांनी फटकारलं

मुंबई– आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारे नाही आहोत, असा टोला उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांनी लगावला. कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. अनेक वर्ष संकल्पना होती. उद्धव ठाकरेंनी दोन महापालिका निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशनचं दाखवून पार पाडल्या. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातीाल एका मार्गिकेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

Sharad Pawar: ‘प्रकाश आंबेडकरांच्या हेतूबाबत आत्ता शंका घेणार नाही’, काय म्हणालेत शरद पवार? रोहित पवारांच्या अटकेवरही केलं भाष्य

पुणे – महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. फक्त वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत चर्चा होणं बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. वंचितला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वंचित मविआसोबत यावी, यासाठी शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न करताना दिसतायेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी दोन ते तीन वेळा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

MNS: महायुतीत मनसेचाही लवकरच समावेश?, शिंदेंची शिवसेना, मनसे, भाजपा एकाच मंचावर, भाजपाच्या बड्या मंत्र्यांनं काय केला दावा?

कल्याण- राज्यात महायुतीत अद्याप मनसेचा समावेश झाला नसला तरी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात महायुतीचे नेते आणि मनसे एकत्र आलेले पाहायला मिळाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसे आमदार राजू पाटील हे आपल्या सोबत असल्याचं वक्तव्य केल्यानं, अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर खासदार श्रीकांत शिंदेही मनसे आमदारांशी बोलताना दिसले. त्यामुळे मनसे महायुतीत होणार का, या चर्चांना पुन्हा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pankaja Munde: ‘पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता नको..’ पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य, लोकसभेसाठी बीडमधून रिंगणात?

मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्याच्या वेळी पंकजा मुंडे आणि अमित शाहा यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येतयं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात वनवासाबाबत सूचक वक्तव्य केलेलं आहे. काय म्हणाल्यात पंकजा मुंडे? बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडेंनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation: सगेसोयरे अध्यादेशावर आचारसंहितेपूर्वी शिक्कामोर्तब?, जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश?

मुंबई – राज्य सरकारनं १० टक्के मराठा आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केल्यानंतरही मराठा समाजात नाराजी कायम आहे. सरकारनं दिलेलं हे आरक्षण कोर्टात टिकेल का, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित करण्यात येतोय. मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील अद्यापही सगेसोयरे अध्यादेशाबाबत आग्रही आहेत. जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करतायेत. या सगळ्या स्थितीत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

TMC Candidates : 16 नेत्यांवर पुन्हा दावा, 12 महिला, 11 नवे चेहरे; तृणमूल स्वबळावर लढणार!

कलकत्ता : इंडिया आघाडीशी (I.N.D.I.A. alliance) काडीमोड करीत आणि काँग्रेसचे (Congress) सर्व प्रस्ताव धुडकावून लावत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी सर्व ४२ जागांवरील उमेदवारांची (TMC Candidate) घोषणा केली. पक्षाने काही खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं टाळलं तर माजी क्रिकेटर युसूफ पठाण, कीर्ती आझाद सारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने आगामी लोकसभेसाठी जाहीर केलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Madhya Pradesh: मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का : महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश!

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बड्या नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून काँग्रेसला (Congress) धक्का दिला आहे. येथील बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी तसेच संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल व अन्य नेत्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी शर्मा […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात दोन राजकीय घराण्यात रंगणार खासदारकीचा सामना? मविआकडून शाहू छत्रपतींना कुणाचं आव्हान?

मुंबई : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Lok Sabha) निवडणूक यावेळी दोन राज घराण्यांत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित मानण्यात येतंय. हा मतदारसंघ शिवसेनेचा असला तरी काँग्रेसच्या चिन्हावर शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) मविआचे (MVA) उमेदवार असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानण्यात येतंय. अशा परिस्थितीत छत्रपतींच्या घराण्यातील उमेदवारासमोर दुसरा तेवढाच मात्तबर […]