ताज्या बातम्या महाराष्ट्र

लालू प्रसाद यादवांविरोधात ‘सीबीआय ‘ ऍक्टिव मोडवर ; अंतिम आरोपपत्र दाखल !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. अशातच आता सीबीआयने (cbi ) ‘लँड फॉर जॉब’ ‘ घोटाळा प्रकरणातील कारवाईला पुन्हा एकदा वेग दिला असून त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि अन्य आरोपींविरोधात अंतिम आरोपपत्र दाखल केलं आहे.त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून दिलासा ; तब्बल सात वर्षानंतर 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणाचा तपास बंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांना एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे . याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोणत्याही गैरकृत्याचा कोणताच पुरावा नाही, त्यामुळे सीबीआयने (CBI)या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे . मात्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंची घरवापसी टळली : शरद पवारांनी सर्व चर्चा फेटाळल्या

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. तसं झालं असतं तर घरवापसी झालेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते. आज होणारा हा संभाव्य प्रवेश मात्र टळला आहे. यावरून शरद पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार – नाना पटोले

X: @therajkaran मुंबई: कॉँग्रेसकडे नागपुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार असून यावेळी नागपुरात कॉँग्रेसची विजयी पताका फडकेल असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज व्यक्त केला.  नाना पटोले म्हणाले, नागपूरसह सांगलीची जागा लढणार आहे. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे, असेही ते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड : आप 

X : @therajkaran मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरचे माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI चे छापे

नवी दिल्ली माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर सीबीआयने आज (२२ फेब्रुवारी) छापा टाकला. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या काळात एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा केला होता. यापूर्वी 6 […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]

विश्लेषण ताज्या बातम्या

“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?

Twitter: @therajkaran मुंबई  सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं केलेल्या छापेमारीनं (Raid by ED on Rajmal Lakhichand Jewelers)एकच खळबळ उडाली आहे. जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बरीच वर्षे खजीनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव (Political pressure on Sharad […]

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – […]