ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत रविंद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?

X: @therajkaran मुंबई : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा करून घेतल्याबद्दल त्यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीविरोधातही गुन्हा दखल करण्यात आला आहे. या चौकशीतून बाहेर पडण्यासाठी वायकर यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची चर्चा, दीपक केसरकर यांचा काय दावा?, संजय राऊत म्हणाले…

मुंबई – आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. ही चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केसरकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे भाजपाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यातूनच आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील सहापैकी पाच जागा भाजपा लढणार?, कोणती एक जागा शिंदे शिवसेनेला?

मुंबई – मुंबई परिसरातील सहा लोकसभा जागांपैकी पाच जागा लढवण्याच्या हालचाली भाजपातून सुरु झाल्याचं दिसतंय. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा भआजाचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबईतील सहापैकी पाच खासदार भाजपाचे असावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच जागा सोडण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय. कोणत्या मतदारसंघांमधून भाजपा इच्छुक? सध्या मुंबईत भाजपाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अमित शाहांसोबतच्या रात्रीच्या खलबतीमध्ये नेमकं काय ठरलं? मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शाहांचा काय संदेश?

मुंबई– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सभा पार पडल्यानंतर अमित शाहा मुंबईत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु होती. जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? महायुतीत लोकसभेच्या ४८ जागांवरुन तिढा निर्माण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार? अमित शाहांच्या संकेतानंतर काय आहे राजकीय प्रतिक्रिया?

मुंबई– केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्म घडामोडी घडताना दिसतायेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावात अमित शाहा यांच्या मंगळवारी जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांतून अमित शाहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या विकासाचा पाढाच त्यांनी सभांमध्ये सांगितलाय. छत्रपती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकला चलो रे ची भूमिका? राजू शेट्टींनी सांगितलं किती लोकसभा मतदारसंघात लढणार

मुंबई – हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी मविआ आणि महायुतीपासून दोन हात लांब राहायचं ठरवलेलं आहे. येणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर आणि एकला चलो रे च्या भूमिकेतून लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चेचा कोणताही प्रस्वातक आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हातकणंगले मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट करतानाच, आपल्याविरोधात उमेदवार द्यायचा की […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नागपुरातून फडणवीस रिंगणात, फडणवीसांचा खांदा वापरुन गडकरींवर हल्ले सुरु’, या नेत्यानं वर्तवलं मोठं भाकित ?

मुंबई – भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नाही, यावरुन ठाकरे शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या कृपाशंर सिंह यांना तिकिट दिलं जातं, मात्र गडकरींसारख्या निष्ठावान आणि कर्तृत्वान मंत्र्याचं नाव यादीत का नाही, असा प्रश्न ठाकरेंची शिवसेना विचारते आहे. गडकरींना डावलण्यात येतंय का? सामना या मुखपत्रात लिहिलेल्या अग्रलेखात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभेच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज? कर्जहमीतून महायुतीचा नवा डाव?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारची कर्जहमी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साखर उद्योगांवर पकड असलेल्या विरोधकांना महायुतीत घेण्यासाठी टाकलेला हा गळ असल्याचा आरोप करण्यात येतोय. ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपात घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यात नव्या आरोपाची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात शाहू छत्रपतींचा पक्ष ठरला, ‘हाता’च्या चिन्हावर निवडणूक रिंगणात, ठाकरेंच्या पदरात काय?

कोल्हापूर – कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती कोणत्या चिन्हावर लढणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. मविआत शाहू छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत एकमत होतं, मात्र या मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा करत, आपल्याच चिन्हावर शाहूंना तिकिट देण्यात यावं असा आग्रह धरण्यात आलेला होता.अखेरीस यावर तोडगा निघालेला आहे. सतेज पाटील यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? भाजपाची राज्यातील उमेदवारांची यादी दोन दिवसात?

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मोठअया घडामोडी होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपावरुन तिढा निर्माण झालेला आहे. भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यां तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. शाहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या जागावाटपावर चर्चा होईल आणि तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात […]