ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

दिल्लीच्या महायुतीच्या बैठकीत जागावाटप फायनल, काय ठरला फॉर्म्युला, शिंदे-पवारांना शाहांचा काय सल्ला?

नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर अपेक्षेप्रमाणे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या समोर सुटल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार, हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपा ३४, शिंदे शिवसेना १० आणि अजित पवार राष्ट्रवादी ४ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अमित शाहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिकचा काळाराम कुणाला पावणार? मोदी, उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेही दर्शनाला

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. पुणे, पशअचिम महाराष्ट्र, मुंबईतील मतदारसंघांच्या भेटीनंतर ते आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली यांच्यासह काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. नाशिकमध्ये दौऱ्याची सुरुवात काळाराम मंदिरातून करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात विरोधाभास’, काय म्हणालेत सरन्यायाधीश?

नवी दिल्ली- विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा गट हीच शिवसेना, असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. या निकालावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाच्या परस्परविरोधी निकाल तर विधानसभा अध्यक्षांनी दिला नाहीये ना, अ्सा सवाल सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयप्रक्रियेच कारणमीमांसा सुप्रीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अमित शाहांच्या दौऱ्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता‎

X: @therajkaran मुंबई : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर, महायुतीत भाजपाला ३२ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामुळं अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. भाजपानं नखानं गळा कापू नये, अशी अपेक्षा रामदास कदमांनी व्यक्त केली. तर अजित पवार उद्या अमित शाहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपातील अनेक दिग्गजांनाही […]

मुंबई ताज्या बातम्या

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

X : @NalavadeAnant मुंबई: धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केली. त्याचवेळी सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रामदास कदमांचे पुत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी, भाईंचा रोष शांत करण्यासाठी निर्णय?

मुंबई : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे धाकटे पूत्र सिद्धेश कदम यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रामदास कदम भाजप विरोधात बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे पूत्र सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निवडणुक प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च : सतेज पाटलांचा निशाणा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. मतदारवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दररोज अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च होत असून, याच खर्चाचा हिशोब मांडून काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज्यातील भाजपाच्या यादीत 10 ते 12 नवे चेहरे? अनेक दिग्गजांचा पत्ता कट?, मोठ्या फेरबदलाचे संकेत

मुंबई – लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प भाजपानं महायुती म्हणून केलेला आहे. महायुतीत ३२ पेक्षा जास्त जागी भाजपा कमळ चिन्हावर उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे सिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत जेवठी अस्वस्थचा आहे, तितकीच अस्वस्थता भाजपातही असल्याचं सांगण्यात येतंय. २०१९ लोकसभेत निवून आलेल्या २३ खासदारांपैकी १० ते १२ खासदाराच्या जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? शेट्टी, जानकरांनाही सोबत घेणार? वंचितला किती जागा?

मुंबई – मविआची बुधवारी झालेली जागावाटपाची बैठक कोणत्याही ठोस तोडग्याविना पार पडल्याचं आता सांगण्यात येतंय. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. या बैठकीत मविआच्या तिढा असलेल्या १५ आणि वंचितनं प्रस्ताव दिलेल्या ५ जागांवर अशी २० जागांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या चर्चेतून तोडगा निघालेला नसल्याचं दिसतंय. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महायुतीत भाजपाला 32 पेक्षा जास्त जागा, शिवसेना, राष्ट्र्वादीला किती? उद्या अजित पवार दिल्लीत

नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपावर येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात झालेल्या चर्चेनंतर बुधवारी संध्याकाळी भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत भाजपा उमेदवारांची नावं फायनल झाल्याचं सांगण्यात येतंय. अमित शाहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक आज उद्यात दिल्लीत होणार […]