मुंबई – लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प भाजपानं महायुती म्हणून केलेला आहे. महायुतीत ३२ पेक्षा जास्त जागी भाजपा कमळ चिन्हावर उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे सिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत जेवठी अस्वस्थचा आहे, तितकीच अस्वस्थता भाजपातही असल्याचं सांगण्यात येतंय. २०१९ लोकसभेत निवून आलेल्या २३ खासदारांपैकी १० ते १२ खासदाराच्या जागी नवे चेहरे दिले जाण्याची चर्चा आहे. तसंच पक्षातील काही निष्ठावंत आणि नेत्यांना लोकसभेत संधी दिली जाईल असं सांगण्यात येतंय.
महिलांना संधी, पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी?
राज्यात भाजपाकडून महिलांना जास्त संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात बीडमधून पंकजा मुंडे, अमरावतीतून नवनीत राणा, नंदूरबारमधून डॉ, हिना गावित, नांदेडमधून डॉ. मीलन खतगावकर धुळ्यातून धरती देवरे, जलगावातून स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच पूनम महाजन, रक्षा खडसे, भारती पवार यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पहावं लागणार आहे.
काही चेहरे बदलणार?
दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उत्तर मध्य किंवा उत्तर पश्चिम मुंबईतून आशिष शेलार, वर्ध्यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांची चर्चा आहे.
या सगळ्यात सुमारे १२ ते १३ खासदारांची तिकिटं कापण्यात येण्याची शक्यता आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्यांना पुन्हा संधी मिळणं अवघड आहे. तसंच पहिल्या टर्ममध्ये केलेल्या कामांच्या आधारावर या निवडमुकीत संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येतंयं.
यांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता?
- उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी
- बीड – खासदार प्रीतम मुंडे
- सांगली- संजय काका पाटील
- नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर
- सोलापूर- डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी
- गडचिरोली- अशोक नेते
- रावेर – रक्षा खडसे
या जागांवर उमेदवार बदलांचे संकेत –
१. बीड
२. लातूर
३. सांगली
४. सोलापूर
५. उत्तर मुंबई
६. उत्तर मध्य
७. नांदेड
८.धुळे
९.अकोला
१०. वर्धा
११. धुळे
१२. जळगाव
हेही वाचाःमविआचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? शेट्टी, जानकरांनाही सोबत घेणार? वंचितला किती जागा?