नवी दिल्ली- विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा गट हीच शिवसेना, असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. या निकालावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाच्या परस्परविरोधी निकाल तर विधानसभा अध्यक्षांनी दिला नाहीये ना, अ्सा सवाल सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयप्रक्रियेच कारणमीमांसा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात असल्याची टिप्पणीही सरन्यायाधीशांनी केलीय. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची प्रत सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
नार्वेकरांच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान
शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 39 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. विधिमंडळ पक्षात शिंदे गटाचं प्राबल्य असल्यानं मूळ पक्षही त्यांचाच असा निर्णय नार्वेकरांनी दिला होता. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुखपद हे अस्तित्वातच नसल्याचं आणि शिवसेनेची मूळ घटना नेमकी कोणती हेही स्पष्ट नसल्याचं अध्यक्षांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. 1द जानेवारीला दिलेल्या या निर्णयाविरोओधात ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी 2023 साली दिलेल्या निकालात केवळ विधिमंडळातील पक्षाच्या बहुमतावर पक्ष कुणाच्याही ताब्यात देता येणार नाही, असा संकेत स्पष्ट केलेला होता. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या या आदेशापेक्षा केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदेंच्या शिवसेनेला मूळ पक्ष म्हणून दिलेल्या मान्यतेला अधिक महत्त्व दिलं.
ठाकरेंच्या शिवसेनेचा काय युक्तिवाद
गुरुवारी झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत युक्तिवाद केला. विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्ष संघटनेतील बहुमताचा मुद्दा उपस्थित करत, विधानसभा अध्यक्षआंनी घटनापीठाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर सरन्यायाधीशांनीही सहमती दर्शवली.
दरम्यान या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत ठाकरेंच्या शिवसेनेतील 16 आमदारांना अपात्र न करण्याचच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आवाहन देण्यात आलेलं आहे. त्यामुळं या एकूण प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार की सुप्रीम कोर्टात हा प्रश्न आहे. या वर 8 एप्रिलला निर्णय करण्यात येणार आहे