ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी म्हणून….’ ; क्लाईड क्रास्टोंचा मोठा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील 10 टक्के आरक्षण घेण्यास तयार, पण…

जालना मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतू यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी SCBC आरक्षण दिले आहे. हे आरक्षण मान्य नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी घेतली होती. आपणात ओबीसीमधील आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील 23 जागांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक, जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय?

मुंबई महाविकास आघाडीसह महायुतीनेही अद्याप लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी केवळ अंदाज वर्तवले जात असताना भाजपने राज्यातील २३ जागांसाठी निरीक्षक नेमल्याचं समोर आलं आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठीच निरीक्षक नेमल्याने जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपच्या मिशन ३७० साठी महाराष्ट्रातून मित्रपक्षांसह ४२ हून जास्त जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद […]

महाराष्ट्र

मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासन संवेदनशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran मुंबई: संवादाची, विचारांची, साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली माय मराठी. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन संवेदनशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी भाषा अभिजात दर्जाबाबत उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत – आमदार मनीषा कायंदे

X: @therajkaran मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या प्रा मनीषा कायंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट २८, २०२३ रोजी गांधीनगर येथे झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांनी मांडला अंतरिम अर्थसंकल्प; या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पवारांनी अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली आणि अर्थसंकल्पाचा शेवट कुसुमाग्रजांच्या एका कवितेतून केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा… मुलींसाठी लेक लाडकी योजना

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नकली बंदुका घेऊन विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर, गोळीबारांच्या घटनांवरुन सरकारला घेराव

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक नकली बंदुका घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. ‘गेली शिवशाही आली गुंडशाही’ घोषणाबाजी विरोधकांकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं झालं ते जाहीर करा’ – नाना पटोले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरुन आता नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक सवाल उपस्थित केला आहे. ‘हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठीच्या अधिवेशनास आज वंदे मातरम आणि राज्य गीताने प्रारंभ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. दुपारी दोन वाजता २०२४-२५ या वर्षाचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतील‌. आज सभागृहात सादर झालेल्या ८ […]