ताज्या बातम्या

शिवसेनेच्या कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

मुंबई साधारण दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला आणि शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. तेव्हापासून राजकीय डावपेच, हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहे. आज त्याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करतील. आणि दोन्ही गटाच्या आमदारांचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल. शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यात शिंदे गटाचे १६ तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुधाला ५ रु. प्रति लिटर अनुदान, रेशीम उद्योग विकासांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने जाहीर केला मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयांवर निर्णय सुनावला आहे. याबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं शिंदेंनी घोषित केलं आहे. याशिवाय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा;’ वाढदिवसाच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांच्या स्टेजवरुन सूचना!

सिल्लोड शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्ता यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात काही हुल्लडबाज करणारी तरुण मंडळीही होती. अब्दुल सत्तारांनी भर स्टेजवरून त्या मुलांना मारण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील एक व्हिडीओ अतुल पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार अपशब्दाचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुका शिंदे-फडणवीस व अजितदादांच्या नेतृत्त्वात लढविणार : चंद्रशेखर बावनकुळे

X: @therajkaran मुंबई: सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा भाजपाचा दुपट्टा घालतो तेव्हा तो कार्यकर्ता होतो. सुपर वॉरियर्सच्या गळ्यात असलेला भाजपाचा दुपट्टा हा हीच त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कार्यकर्त्यांनी आपला सन्मान व या दुपट्ट्याची शान राखण्यासाठी पक्षकार्य करताना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करावे. मुंबई शहरातील मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार, शिंदे गट भाजपात जाणार : संजय राऊत यांचा दावा

X: @NalavadeAnant मुंबई: काही ना काही तरी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे वादग्रस्त व्यक्तिमत्व व ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले. हे दोघेही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात प्रवेश करतील असा काहीसा धक्कादायक व खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. […]

महाराष्ट्र

आता एकच लक्ष….. मिशन ४८

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने फुंकले प्रचाराचे रणशिंग…! X: @NalavadeAnant मुंबई: राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी राज्यभर शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा […]

महाराष्ट्र

तिजोरीत पैसे नसताना नव्याने १८ हजार ३९९ कोटी द्यायचे कुठून?

राज्याचे अर्थ खाते विवंचनेत…..!  X: @NalavadeAnant मुंबई: एकीकडे ज्या कंत्राटदारांनी राज्यांतील विविध विकास प्रकल्प महायुती सरकारच्या भरवशावर गेल्या वर्ष सव्वा वर्षात स्वबळावर पूर्ण केले, त्यांच्या कामांची तब्बल १५ ते २० हजार कोटींची बिले देण्यास या सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिले कशी अदा करायची या विवंचनेत अर्थ खाते सापडले आहे. आगामी लोकसभा निवडणुक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाहन अपघात टाळण्यासाठी ऑटोमेटिक फिटनेस सेंटर्स – मुख्यमंत्री

X: @therajkaran नागपूर: राज्यातील वाहन अपघात टाळावेत यासाठी योग्य व फिट वाहनचालक असावेत यासाठी सतरा ठिकाणी ऑटोमेटिक ड्रायव्हिंग टेस्ट (automatic driving test), आणि तेवीस ठिकाणी ऑटोमेटिक फिटनेस सेंटर्स (automatic fitness centres) निर्माण केली जातील, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जानेवारी ते जून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अपात्रतेवर सुनावणी, कोणत्या आमदारांची उलटतपासणी होणार?

Twitter : @therajkaran नागपूर आजपासून नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अधिवेशनासोबत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवरील सुनावणी (Hearing on Disqualification of MLAs) सुरू राहणार आहे. यात शिंदेंसोबतच्या अनेक आमदारांची उलटतपासणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्यापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन, विरोधक कोण-कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार?

नागपूर राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (7 डिसेंबर) नागपूरात सुरू होणार आहे. विरोधक अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपासूनच विरोधकांनी याची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टरवॉर सुरू केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे, यावर नजर टाकूया.