राष्ट्रीय ताज्या बातम्या

ईपीएस कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतन दरमहा नऊ हजार मिळावे; कॉँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची मागणी

X : @therajkaran कोल्हापूर : ईपीएस – ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी कॉँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (Congress MP Shahu Chhatrapati) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केली. पेन्शन (Pension) महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेस लढविणार…..!

X: @therajkaran मुंबई: येत्या जून महिन्यात होऊ घातलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवेल, असे परस्पर जाहीर करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची सांगली जागा परस्पर जाहीर केल्याचा बदला घेतला असे मानले जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ २०१८ मध्ये एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे इच्छुक अनेक

X : @ ajaaysaroj बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर , बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यावेळी उपस्थित होते.पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून , माजी मंत्री ,जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषाताई निमकर, माजी खासदार बळीराम जाधव , बोईसरचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगरी – कुणबी मतदार ठरवणार भिवंडीचा खासदार

पाटील, म्हात्रे, सांबरे यांची सर्व भिस्त जातीवरच X: @ajaaysaroj जाता जात नाही ती जात, असे नेहमीच म्हंटले जाते. पुरोगामीत्वाचे ढोल पिटणारे बहुतांश राजकीय पक्ष जातीचे राजकारण खेळण्यात जास्त पुढे असतात हे महाराष्ट्र गेली दोन दशके प्रामुख्याने बघत आलाय. भिवंडी मतदारसंघात देखील याच जातीच्या समिकरणांमुळे उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय. जवळपास वीस लाखाच्या मतदारसंघात आगरी व कुणबी […]

महाराष्ट्र

नारायण राणे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार..!

राऊत यांच्याही पेक्षा करणार मोठं शक्ती प्रदर्शन…! सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे येत्या शुक्रवार दि.१९ ,एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भाजप प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी ‘मविआ ‘तर्फे आपला उमेदवारी अर्ज कालच मोठं शक्ती प्रदर्शन करत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी; चौरंगी लढत होणार ?

By संतोष पाटील पालघर: जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीतला भाऊ मोठा; जागावाटपात कॉंग्रेसच्या नशिबी आलाय गोटा

X: @ajaaysaroj महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेत असला तरी, जागावाटपावर नजर टाकल्यास त्यांच्या नशिबी गोटा आला आहे. अंतिम जागा वाटपात ऐतिहासिक महाफुटीची झळ सोसलेले प्रादेशिक पक्ष शिवसेना उबाठा गट २१ जागा व शरद पवार गट १० जागा लढवत असताना देशपातळीवरील अखंड काँग्रेसवर अवघ्या १७ जागा लढवायची नामुष्की आली आहे. एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या बिनशर्तमध्ये, दडला विधानसभेचा गर्भित अर्थ

X: @ajaaysaroj मुंबई: मनसेची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित घोषणा अखेर एकदाची अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महायुतीला नव्हे तर नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन राज्यभर असणाऱ्या आणि शिवतीर्थावर कानात प्राण आणून बसलेल्या मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश त्यांनी काल दिला. मला राज्यसभा, विधानपरिषद काहीही नको, लोकसभाही तुम्हीच लढवा, खंबीर नेतृत्व देशात असावे म्हणून फक्त मोदींना पाठिंबा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अरुण गवळीचा मार्ग मोकळा, “त्याचे” बाहेर येणे, कोणाच्या फायद्याचे…

X: @ajaaysaroj मुंबई: तो बाहेर येतोय, तो अंडरवर्ल्डचा हिंदू डॉन आह, ही पदवी त्याला थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनीच दिली आहे, ज्याची दगडी चाळ म्हणजे जणूकाही अभेद्य किल्लाच, त्याचा नवरात्रोत्सव म्हणजे टॉक ऑफ द टाऊन, हो तोच ज्याला त्याचे खासलोक प्रेमाने डॅडी बोलतात, ज्याच्याकडे “चुकीला माफी नाही” असे बोलले जाते, तोच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर दगडी चाळीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला

X:@ajaaysaroj ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण चार जागा येतात, त्यापैकी दोन शिवसेना आणि दोन भाजप असा सन्मानजनक तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण, ठाणे शिवसेनेकडे तर भिवंडी, पालघर भाजपकडे अशा सर्वमान्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार, मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत […]