ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली मतदारसंघाचा तिढा दिल्लीच्या दारी ; ठाकरेंच्या उमेदवारीवरून ठिणगी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची १७ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे .कारण सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आघाडीत नाराजीचा सूर पसरला आहे . सांगली जिल्ह्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितचा मविआला रामराम ; मराठा योध्यासोबत नवी आघाडी स्थापन करणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना वंचीत बहुजन आघाडीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)साथ सोडत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांना सोबत घेऊन ताकदीनं या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता आघाडीला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपने उमेदवारी नाकारलेल्या वरुण गांधींना अमेठीतून काँग्रेसची उमेदवारी?

मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांना भाजपनं (bjp )पिलिभीत मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आहे . त्यानंतर आता त्यांना काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी(Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाचा सांगावा धाडला आहे.त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उमेदवार यादी जाहीर आणि ठाकरेंच्या उमेदवाराला ईडीचं समन्स, काय आहे प्रकरण?

मुंबई – महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अमोल कीर्तिकर लागलीच अडचणीत आल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात त्यांना ईडीचं समन्स जारी करण्यात आल्याची माहिती आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे याच मतदारसंघातून खासदार आहेत, मात्र ते शिंदेंच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची घोषणा केल्यानंतर विशाल पाटलांची भूमिका काय असेल?

सांगली : उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी १७ नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उद्भव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील तिढा वळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही आहेत. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळं आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत जाणार का? जरांगे पाटलांची प्रकाश आंबेडकरांनी का घेतली मध्यरात्री भेट? आजचा दिवस निर्णायक

मुंबई- मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचं दिसत असतानाच वंचित मविआसोबत जाणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआतील तिढा सुटला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च म्हणजेच मंगळवारी मविआनं प्रकाश आंबेडकरांना चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सात जागांवर वंचित अडून बसल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! एका क्लिकवर वाचा राजकीय समीकरण!

मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून घटकपक्षांसह जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांसह संभाव्य उमेदवारांचेही जीवही टांगणीला लागले आहे. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा आकडा सूत्रांकडून सांगण्यात आला आहे. यानुसार, महायुतीचे जागावाटपासह उमेदवारांची नावंही ठरली असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मार्च, गुरुवारी म्हणजे उद्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha : नंदुरबारच्या आखाड्यात गावितांना टक्कर देणारे गोवाल पाडवी कोण आहेत?

नंदुरबार : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे सुपूत्र अॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नंदुरबारात वकील विरूद्ध डॉक्टर असा सामना रंगणार आहे. २०१९ च्या लोकसभेत भाजपच्या हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवांचा पराभव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर

मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या महायुतीच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर, ओबीसी नेते म्हणून भुजबळांना संधी मिळणार ?

नाशिक- नाशिक लोकसभेच्या जागेवारुन महायुतीत तिढा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी ठाण्य़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शनंही केलं. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे यांनीही भाजपाही या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. भाजपानंही या मतदारसंघावर दावा सांगितलेला […]