मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना वंचीत बहुजन आघाडीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)साथ सोडत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांना सोबत घेऊन ताकदीनं या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता आघाडीला लोकसभेच्या तोंडावर चांगलाच धक्का बसला आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रात्री अचानक प्रकाश आंबेडकर यांनी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली.मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत वेळ आल्यावर नक्की सांगणार असं आंबेडकर म्हणाले आहेत .अकोल्यामधून आंबेडकर रिंगणात उतरणार असून त्यांनी महाविकास आघाडीला सोडून स्वबळावर लढताना आपल्या नवीन पक्षाच्या उमेदवारांची घोषणा देखील केली आहे .काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातुन पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे त्यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं आहे . येत्या लोकसभा निवडणुकीत विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे .
वंचित अकोल्यातून निवडणूक लढवताना केवळ उमेदवार निवडणुकीत उतरवणार नाही, तर त्यांना निवडून आणणार, असा निर्धारही आंबेडकर यांनी व्यक्त केला.भाजपनं मुस्लिमांना एकटं पाडण्याचं राजकारण सुरू केलं आहे. त्याला उत्तर म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारही उतरवणार आहोत. त्याचबरोबर जैन समाजाचे उमेदवारही उतरवणार आहोत. यामध्ये सर्वाना संधी देणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे . या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून कुमारी प्राजक्ता तारकेश्वर टिल्लेवार याना तर बुलढाणा मतदारसंघात वसंत राजाराम मगर यांना संधी देण्यात येणार आहे . वंचितचा नवा पक्ष तयार झाला तर महाविकास आघाडीला किती भारी पडेल हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे .