जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन, काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

बीड- बीडच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणींची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना पदर पसरते, ही एक संधी आपल्याला द्या, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालंय. याचवेळी त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतोय ; शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा, बैठकांना जोरदार वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप(Bharatiya Janata Party ) , मोदी सरकार आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली आहे .याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार साहेबांनी किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडीओ दाखवले, तर अवघड होईल, […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

जाहीर प्रचार संपल्यानंतर परभणीत रात्री ड्रामा, महायुतीचे उमेदवार जानकर यांची गाडी तपासण्यावरुन वाद

परभणी – दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. आता शुक्रवारी राज्यातील ८ जागी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी पुढचे काही तास हे संपर्कासाठी आणि छुप्या प्रचारासाठी महत्त्वाचे मानले जातात. याच काळात परभणीत रात्री महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या गाडीची तपासणी काही तरुणांनी केल्यानं खळबळ उडालीय. महादेव जानकर त्यावेळी गाडीत नव्हते. मात्र गाडीचे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

उद्या मतदानाचा दुसरा टप्पा; 12 राज्यं आणि 88 मतदारसंघात मतदान

नवी दिल्ली : उद्या 26 एप्रिल रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात आठ मतदारसंघातील मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेश मिळून ८८ लोकसभा मतदारसंघांवर मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे गटाचे नेते भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारूचे परवाने; माहिती दडवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या जागेवरुन एकनाथ शिंदे गटाचे संदीपाम भुमसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादरम्यान संदीपाम भुमसे यांच्या पत्नीच्या संपत्तीवरुन मोठा खुलासा झाला आहे. सोमवारी २२ एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुमरे यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवण्यात आला होता. यानंतर विरोधकांनी टीका केल्यानंतर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Lok Sabha Election : काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनी सांगितलेला अमेरिकेतील वारसा कर काय आहे?

नवी दिल्ली : काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. भारतात वडिलोपार्जित संपत्तीवर कर लावण्याबाबत पित्रोदा यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, अमेरिकेत वडिलोपार्जित संपत्तीवर टॅक्स लावला जातो. भारतातही यावर चर्चा व्हायला हवी. या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्याचा गड राखण्यासाठी भाजपचा डाव ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहिते पाटलांच्या होमग्राउंडवर विराट सभा

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आता या मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढल्या असून हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने नवा डाव आखत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना मैदानात उतरवण्याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात वंचितची खेळी ; अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा ; प्रणिती शिंदेंचे टेन्शन वाढणार!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असताना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok_Sabha constituency) नवा ट्विस्ट आला आहे . या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi )माघार घेतली आहे . या मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती . मात्र त्यांनी या मतदारसंघात वंचितला पाठींबा मिळणार नसल्याच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात शरद पवारांच बळ वाढलं ; संजय क्षीरसागरांचा भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना माढ्यात (Madha Lok Sabha Election) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी आपली ताकद वाढवत भाजपला मोठा धक्का दिला आहे . मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी भाजपला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बच्चू कडू यांना जिल्हा परिषदेची परवानगी होती : राज्य निवडणूक अधिकारी

X : @therajkaran मुंबई: अमरावती येथील सभेसाठी प्रहार स़ंघटनेला फक्त जिल्हा परिषदेची परवानगी प्राप्त झाली होती, अन्य परवानग्या मिळाल्या नव्हत्या, असा प्राथमिक अहवाल असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता राज्यात लागू झाल्यापासून आतापर्यंत सीआरपीसी कायद्यांतर्गत ९५ हजार २५० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली. […]