महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये भाजपला उमेदवार सापडत नाही : आदित्य ठाकरे यांची टीका  

X: @therajkaran पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (Shiv Sena UBT) गटाच्या भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून (MVA) शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ठाकरे यांनी यावेळी वाढवण बंदर विरोधात जनतेच्या सोबत राहू, असे आश्वासन दिले. पालघर (Palghar Lok Sabha) आणि इतरत्र भाजपकडून अथवा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमरिश पटेल यांच्या संस्थेवर नागपूर मनपा मेहेरबान; 600 कोटीची जमीन दिली 1 रुपये भाडे दराने

X: @therajkaran मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे होमपिच असलेल्या नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) याच पक्षाचे माजी विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेला सुमारे 600 कोटी रुपये बाजारमुल्य असलेली जमीन अवघ्या 1 रुपया प्रती चौरस फुट या दराने भाडे कराराने दिली आहे. या विरोधात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्बल २५ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार !

मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपची खेळी ; शरद पवारांचे विश्वासू अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर ?

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला चितपट करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे माढ्यात आपला उमेदवार निवडून आणण्याच मोठं आव्हान भाजपासमोर निर्माण झालं. दरम्यान उत्तमराव जानकर पवार गटाकडे झुकले आहेत. त्यामुळे भाजपाने (bjp) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची ख्याती आता धमकी बहाद्दर अशी झालीय ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे जोरदार खटके उडताना दिसत आहेत . राष्ट्रवादीत बंड करून भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी २०१९ साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले यावरून बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या ” ; छगन भुजबळांचा पंकजा मुडेंना टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकमधून मी प्रीतम मुंडेंना उभी करेन असं वक्तव्य केल होत . त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांनी त्यांना तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत नवा ट्विस्ट, नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय . या मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर माघार घेतली होती . भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला होता .आता भाजपकडून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिक लोकसभा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन अमित शाह आणि शरद पवारांत जुंपली, शाह म्हणाले माफी मागा, पवारांचं काय उत्तर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगत चाललेला दिसतोय. पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर सत्ताधारी भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसही मुस्लीमधार्जिणी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय. राम मंदिराला (Ram temple) काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीनं विरोध केल्याचं ते आता सभांमध्ये सांगतायेत. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादाचं दिल्लीत ऐकतंय कोण ? ; भारतरत्न देण्याच्या घोषणेवरून जयंत पाटलांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ( Sharad Pawar Group)आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रकाशित करण्यात आला. त्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील( Jayant Patil )यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आश्वासनावर निशाणा साधला आहे . त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

पाच वर्षांत कोणतंही पद नसताना पंकजा मुंडेंच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ, किती आहे पंकजा मुंडेंची संपत्ती?

बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या […]