ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे कराळे मास्तरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, लोकसभेची तयारी?

Nitesh Karale Joins Pawar’s NCP : स्पर्धा परीक्षा, एमपीएससी विद्यार्थ्यांना धडे देणारे नितेश कराळे यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे. उद्या ३० मार्च रोजी शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार देणार का? मनोज जरांगे पाटील उद्या घेणार निर्णय? संभाजीनगरच्या बैठकीत का झाला राडा

मुंबई – लोकसभा निवडणुकांत मराठा समाजाचे उमेदगवार उभे करायचे की नाही, यावर उद्या आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान एका वृत्त्वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सामान्यांनी आता सत्तेत जाण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. मात्र उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर सकल मराठा समाजात एकमत होताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पाणावलेले डोळे, राजीनाम्याची घोषणा करताना लंके भावुक; आता शरद पवार गटातून लोकसभेचे उमेदवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्ता बैठकीत आपल्या पारनेरच्या आमदाकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि कार्यकर्त्यांसमोर ते भावुक झाले होते. निलेश लंके लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्या लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं लंके यावेळी म्हणाले. यावेळी लंकेनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मैत्रीपूर्ण लढाई! या मतदारसंघात मविआतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात; महाआघाडीत ‘तिघाडी’

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून चर्चा सुरू असतानाही ठाकरे गटाकडून या मतदारसंघात उमेदवारी घोषीत केल्यामुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाकरे गटही आपल्या उमेदवारावर ठाम असल्याने काँग्रेसने ‘मैत्रीपूर्ण लढाई’ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणायला ही लढाई मैत्रीपूर्ण वाटत असली तरी प्रत्यक्षात दोन्हीही पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पुन्हा मतांच्या विभाजनाला आणि परिणामी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाराज आवाडेंनी मशाल हाती घेतल्यास हातकणंगलेचं चित्रच पालटणार; नेमकी काय आहे मविआची खेळी?

हातकणंगले : शिंदे गटाची उमेदवाराची यादी समोर आल्यानंतर हातकणंगलेचा तिढा सुटला आहे. येथून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील माने यांनी कोल्हापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं, कार्यकर्त्यांनीही आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. मात्र या जागेवरुन धैर्यशील माने यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पोळीवर पडले तूप शिवतारे झाले चूप

शिवतारेंचे बंड स्क्रिप्टप्रमाणेच झाले थंड X : @ajaaysaroj मुंबई: जनतेचे प्रश्न सोडवण्याची हमी मिळाल्याने आपले समाधान झाले आहे, अशी मखलाशी करून स्वतःचा मतलब साधत शिवसेनेचे आक्रस्ताळे नेते विजय शिवतारे यांनी स्वतःच्या फुगवलेल्या फुग्याला स्वतःच टाचणी लावली आहे. महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आता त्यांनी स्वतःच्या गळ्यात हार म्हणून घातला असून पोळीवर तूप मिळाल्यानेच विजयबापू चूप झाले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

… अन् शरद पवारांनी उडवली कॉलर, साताऱ्यात उदयनराजेंचीच नक्कल

सातारा : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी उदयनराजेंची नक्कल करीत कॉलर उडवून दाखवली. त्यांनवी कॉलर उडवल्यानंतर एकच हशा पिकला. उदयनराजे यांनी साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? च्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठींबा

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Loksabha) काँग्रेसने महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )यांना उमेदवारी दिली आहे . तर आज महायुतीकडून त्यांच्याविरोधात संजय मंडलिक रिंगणात उतरले आहे . मात्र महाराजांच्या या उमेदवारीला याआधी वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला होता . आता त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील ओबीसी बहुजन पार्टीने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राफेल विमानप्रकरणी पंतप्रधानांना अटक केली पाहिजे “; प्रकाश आंबडेकराचं विधान

मुंबई : दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Yashwant Ambedkar)यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi ) निशाणा साधला आहे .मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“मोदीं इंडिया आघाडीला घाबरले ; चार सो पारचा नारा तडीपार होणार” ; प्रणिती शिंदेचा टोला

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूर मतदारसंघातुन जोमाने तयारीला लागल्या आहेत . यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे . त्या म्हणाल्या , नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’, असा नारा दिला आहे. मात्र इंडिया आघाडी मुळे नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत.’चार सौ पार’ होणार […]