महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे गटाला धक्का : अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

X: @therajkaran शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (Eow Inquiry) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भात चौकशी सुरू केली असून या चौकशीसाठीच अनिल देसाई यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आमदाराकडून विनयभंग? चौकशी करण्याची हिम्मत दाखवा – काँग्रेस

X: @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या नात्याने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिवाळखोरीकडे नेणारा…!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रखर टीका… X: @therajkaran राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब,सामान्य जनता,शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार युवा पिढी,मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प अशा शब्दात हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वासाधारण चर्चेवेळी बोलताना […]

महाराष्ट्र

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

X: @therajkaran दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी केलेल्या एक लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या करारांपैकी ७३ टक्के प्रकल्पांची आत्तापर्यंत राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली असून गेले १६ महिने महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत देशात क्रमांकावर असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी विधानपरिषदेत २६० अन्वये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही……!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही X: @therajkaran मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याचा तपास सुरु असल्याने याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सुस्पष्ट […]

महाराष्ट्र

मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका

X: @therajkaran मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृतीगंभीर आजारी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते सध्या आयसीयूमध्ये असून निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अभिषेकला विश्वासघाताने संपवले, आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा

विनोद घोसाळकर यांचे निवेदन माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुरलीधरन, विजया रहाटकर यांना भाजपची उमेदवारी?; पार्थ पवारांनाही राज्यसभेची लॉटरी?

X : @vivekbhavsar मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. सहा पैकी पाच जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले आहे. विधानसभेचे सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतात. सध्या विधानसभेचे २८६ सदस्य आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक केसरकर

X: @therajkaran मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थांनांमुळे झाले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीला या संस्थानांचा इतिहास कळावा यासाठी त्यासंबंधी पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करा….!

राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यापीठांना निर्देश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये तसेच नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी येथे दिले. आज राजभवन येथे बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक पार […]