महाराष्ट्र ताज्या बातम्या

आगरी – कुणबी मतदार ठरवणार भिवंडीचा खासदार

पाटील, म्हात्रे, सांबरे यांची सर्व भिस्त जातीवरच X: @ajaaysaroj जाता जात नाही ती जात, असे नेहमीच म्हंटले जाते. पुरोगामीत्वाचे ढोल पिटणारे बहुतांश राजकीय पक्ष जातीचे राजकारण खेळण्यात जास्त पुढे असतात हे महाराष्ट्र गेली दोन दशके प्रामुख्याने बघत आलाय. भिवंडी मतदारसंघात देखील याच जातीच्या समिकरणांमुळे उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय. जवळपास वीस लाखाच्या मतदारसंघात आगरी व कुणबी […]

महाराष्ट्र

नारायण राणे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार..!

राऊत यांच्याही पेक्षा करणार मोठं शक्ती प्रदर्शन…! सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे येत्या शुक्रवार दि.१९ ,एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भाजप प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी ‘मविआ ‘तर्फे आपला उमेदवारी अर्ज कालच मोठं शक्ती प्रदर्शन करत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लेकीच्या स्वार्थासाठी पवारांनी पातळी सोडली, दात विचकून हसणाऱ्या डॉ कोल्हेचा बुरखापण फाटला

X: @ajaaysaroj लेकीच्या स्वार्थासाठी पातळी सोडून बोलणारा बाप संपुर्ण महाराष्ट्राने काल बघितला. गेली पाच दशके महाराष्ट्रातील जनतेला पुरोगामीत्वाचे डोस पाजणाऱ्या शरद पवार यांचा दांभिक बेगडी चेहरा देशासमोर उघडा पडला. तर पवारांच्या मांडीला मांडी लावून दात विचकून हसणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा मुखवटा किती बेगडी आहे, त्यांच्या मनात स्त्रीबद्दल काय भावना आहेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी; चौरंगी लढत होणार ?

By संतोष पाटील पालघर: जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीतला भाऊ मोठा; जागावाटपात कॉंग्रेसच्या नशिबी आलाय गोटा

X: @ajaaysaroj महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेत असला तरी, जागावाटपावर नजर टाकल्यास त्यांच्या नशिबी गोटा आला आहे. अंतिम जागा वाटपात ऐतिहासिक महाफुटीची झळ सोसलेले प्रादेशिक पक्ष शिवसेना उबाठा गट २१ जागा व शरद पवार गट १० जागा लढवत असताना देशपातळीवरील अखंड काँग्रेसवर अवघ्या १७ जागा लढवायची नामुष्की आली आहे. एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या बिनशर्तमध्ये, दडला विधानसभेचा गर्भित अर्थ

X: @ajaaysaroj मुंबई: मनसेची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित घोषणा अखेर एकदाची अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महायुतीला नव्हे तर नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन राज्यभर असणाऱ्या आणि शिवतीर्थावर कानात प्राण आणून बसलेल्या मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश त्यांनी काल दिला. मला राज्यसभा, विधानपरिषद काहीही नको, लोकसभाही तुम्हीच लढवा, खंबीर नेतृत्व देशात असावे म्हणून फक्त मोदींना पाठिंबा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेनेत

महाविकास आघाडीला धक्का X @ajaaysaroj मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत काँग्रेसचा सुशिक्षित सॉफीस्टिकेटेड चेहरा, संयमी प्रवक्ते, राज्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाघमारे यांच्या सेनाप्रवेशाने पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारा अभ्यासू वक्ता काँग्रेसने ऐन निवडणुकीत गमावला आहे. गेली जवळपास ३६ वर्षे विविध व्यासपीठावरून डॉ वाघमारे यांनी काँग्रेसची आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीचा नाशिकमध्ये नवीन पवित्रा

भुजबळ- गोडसे पिछाडीवर कोकाटे- बोरस्ते- ढिकले आघाडीवर X: @ajaaysaroj भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील नाशिकचा तिढा काही केल्या सुटेना, एकही पक्ष मागे हटेना, अशी बिकट परिस्थिती जागावाटपात निर्माण झाली असतानाच महायुतीच्या नेत्यांनी इथे नवीन पवित्रा घेतला आहे. महायुतीने आता छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांच्या ऐवजी राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे आणि अजय बोरास्ते यांच्या नावाची चाचपणी सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अरुण गवळीचा मार्ग मोकळा, “त्याचे” बाहेर येणे, कोणाच्या फायद्याचे…

X: @ajaaysaroj मुंबई: तो बाहेर येतोय, तो अंडरवर्ल्डचा हिंदू डॉन आह, ही पदवी त्याला थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनीच दिली आहे, ज्याची दगडी चाळ म्हणजे जणूकाही अभेद्य किल्लाच, त्याचा नवरात्रोत्सव म्हणजे टॉक ऑफ द टाऊन, हो तोच ज्याला त्याचे खासलोक प्रेमाने डॅडी बोलतात, ज्याच्याकडे “चुकीला माफी नाही” असे बोलले जाते, तोच अरुण गवळी तुरुंगातून बाहेर दगडी चाळीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन भाजप – दोन शिवसेना, ठाणे जिल्ह्यात ठरला फॉर्म्युला

X:@ajaaysaroj ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या एकूण चार जागा येतात, त्यापैकी दोन शिवसेना आणि दोन भाजप असा सन्मानजनक तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण, ठाणे शिवसेनेकडे तर भिवंडी, पालघर भाजपकडे अशा सर्वमान्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार, मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत […]